Record Bonus Announcement | चिनी बॉसने कर्मचार्‍यांना दिला ‘इतका’ बोनस...

Record Bonus Announcement
Record Bonus Announcement | चिनी बॉसने कर्मचार्‍यांना दिला ‘इतका’ बोनस...
Published on
Updated on

बीजिंग : सध्या एक चिनी कंपनी आणि तिचा बॉस खूप चर्चेत आहे. कारण, हा बॉस बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जात आहे आणि त्याचा प्रत्येक कर्मचारी उत्सुक दिसत आहे. कारण, तो कर्मचार्‍यांना ठरावीक रक्कम बोनस म्हणून देत नाही, तर रोख पैसे देतो. पैसे देताना तो जितके घेऊ शकता तितके घ्या, असे देखील म्हणत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, एक चिनी कंपनी आणि तिच्या बॉसने 270 मिलियन युआनच्या नफ्यातून 180 मिलियन युआन (26 मिलियन अमेरिकी डॉलर)चा बोनस वर्षाच्या शेवटी वाटून चर्चेचा केंद्रबिंदू बनले.

13 फेब—ुवारी रोजी, हेनान कुआंगशान क्रेन कंपनी लिमिटेडने आपला वार्षिक समारंभ आयोजित केला. या दरम्यान सुमारे 60 मिलियन युआन (8.7 मिलियन अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त रोख बोनस तिथेच वाटला गेला. यावेळी सुमारे 7,000 लोकांसाठी 800 जेवणाचे टेबल्स लावण्यात आले होते. नंतर बंडलच्या बंडल टेबलवर ठेवले गेले. मग कर्मचार्‍यांना बोनस घेण्यासाठी बोलावले गेले. कर्मचार्‍यांना ठरावीक वेळेत नोटांचे बंडल उचलून रक्कम मोजावी लागली. ठरलेल्या वेळेत जितकी रक्कम मोजली, ती घरी नेऊ शकतात. त्यानंतर कर्मचार्‍यांनी नोटांचे बंडल उचलून मोजून आपल्याजवळ ठेवले.

वेळ संपल्यानंतर ज्याच्याकडे जितके नोटांचे बंडल होते, ते त्यांचा बोनस होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण केले गेले. सोशल मीडियावर कंपनीच्या बोनस वितरण कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कर्मचारी टेबलवर पसरलेले रोख पैसे मोजताना किंवा खाली ठेवलेले नोटांचे बंडल उचलताना दिसत आहेत. कारण, बोनस वितरण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झाले, त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये रोख वेगवेगळ्या पद्धतीने वाटले गेले; पण अट एकच होती, ठरावीक वेळेत रोख मोजून आपल्याजवळ ठेवणे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news