Adam-Yu Ultra humanoid robot | चीनच्या ‘अ‍ॅडम-यू अल्ट्रा’ ह्युमनॉईड रोबोचा थक्क करणारा डान्स

Adam-Yu Ultra humanoid robot
Adam-Yu Ultra humanoid robot | चीनच्या ‘अ‍ॅडम-यू अल्ट्रा’ ह्युमनॉईड रोबोचा थक्क करणारा डान्स
Published on
Updated on

बीजिंग : तंत्रज्ञानाच्या जगात दररोज नवनवीन चमत्कार पाहायला मिळत आहेत. चीनमधील ‘PNDbotics' या रोबोटिक्स कंपनीने नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित केला असून, यात त्यांचा ‘Adam- U Ultra’ (अ‍ॅडम-यू अल्ट्रा) हा ह्युमनॉइड (मानवी रूप असलेला) रोबो अतिशय चपळाईने नृत्यामधील अवघड स्टेप्स करताना दिसत आहे. संगीताच्या तालावर एकही चूक न करता या रोबोने केलेला डान्स पाहून जगभरातील तंत्रज्ञ थक्क झाले आहेत.

‘अ‍ॅडम-यू अल्ट्रा’ हा गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडम’ रोबोची प्रगत आवृत्ती आहे. या रोबोच्या डान्समध्ये हात, कंबर आणि पायांच्या हालचाली इतक्या नैसर्गिक आहेत की तो एखाद्या मानवासारखाच वाटतो. कंपनीच्या मते, या रोबोमध्ये 41 स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणारे सांधे ((Actuators) आहेत. याचमुळे तो फ्रीस्टाईल डान्ससारख्या कठीण हालचाली सहज करू शकतो. व्हिडीओमध्ये तो ‘चार्ल्सटन’ डान्स करत असल्याचा उल्लेख असला, तरी त्याच्या हालचाली ‘हिप-हॉप’ शैलीशी अधिक मिळत्याजुळत्या आहेत.

या रोबोच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी झछऊलेींळली ने प्रगत कंट्रोल सिस्टम वापरली आहे. Nvidia Jetson Orin Module : रोबोटचा ‘मेंदू’ म्हणून काम करणारी ही सिस्टम AI प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. VLA मॉडेल (Vision- Language- Action): या रोबोमध्ये अत्याधुनिक व्हिजन-लँग्वेज-अ‍ॅक्शन मॉडेल आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही या रोबोशी बोलून त्याला सूचना देऊ शकता आणि तो त्यानुसार कृती करेल. रिअल-टाइम लर्निंग : सुमारे 10,000 वास्तविक वर्तणुकीच्या नमुन्यांच्या आधारे हा रोबो बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्यास शिकला आहे.

रोबोचा तोल जाऊ नये आणि तो स्थिर राहावा यासाठी ‘न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग’चा वापर करण्यात आला आहे. त्याच्या डोळ्यांचे Intel RealSense D455 डेप्थ व्हिजन सेन्सर आणि लिडार ( ङळवरी) कॅमेरे करतात, ज्यामुळे त्याला परिसराचे 3डी मॉडेल समजते आणि वाटेत येणार्‍या अडथळ्यांची अचूक जाणीव होते. सध्या ‘PNDbotics’ कंपनी अशाच प्रकारचे आणखी चार मोबाईल ह्युमनॉइड रोबो विकसित करत आहे, जे भविष्यात मानवी कामे अधिक कार्यक्षमतेने करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news