Quasi Moon | चीनची गुप्त मोहीम : अंतराळ यान पृथ्वीच्या ‘छद्म-चंद्रा’जवळ पोहोचले

Quasi Moon  |
Quasi Moon | चीनची गुप्त मोहीम : अंतराळ यान पृथ्वीच्या ‘छद्म-चंद्रा’जवळ पोहोचले
Published on
Updated on

बीजिंग : चीनचे एक अत्यंत गोपनीय अंतराळ यान पृथ्वीच्या एका 'क्वासी-मून' म्हणजेच छद्म-चंद्र किंवा आभासी चंद्राजवळ यशस्वीरीत्या पोहोचले आहे. 'तियानवेन-२' असे नाव असलेले हे यान या लघुग्रहावर उतरण्याचा प्रयत्न करणार असून, अशी कामगिरी करणारी ही जगातील पहिलीच मोहीम ठरणार आहे.

चीनच्या या महत्त्वाकांक्षी आणि गुप्त मोहिमेवर जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्या खगोलीय वस्तूला 'क्वासी-मून' म्हटले जात आहे, त्याचे अधिकृत नाव 'कामोओलेवा' (Kamo'oalewa / 2016 HO3) असे आहे. हा एक लहान लघुग्रह आहे, जो सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच पृथ्वीच्याही कक्षेभोवती फिरतो. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना तो आपल्या चंद्रासारखाच भासतो, म्हणून त्याला 'छद्म-चंद्र' किंवा 'आभासी चंद्र' असे म्हटले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह कोट्यवधी वर्षांपूर्वी चंद्राचाच एक तुकडा तुटून निर्माण झाला असावा. हा लघुग्रह आकाराने अत्यंत लहान आणि अनियमित आहे. अशा खडकाळ आणि कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या लघुग्रहावर उतरणे अत्यंत आव्हानात्मक आहे. चीनचे हे यान तिथे सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न करेल. हे यान केवळ तिथे उतरणार नाही, तर तिथल्या मातीचे आणि दगडांचे नमुने गोळा करून ते पुन्हा पृथ्वीवर घेऊन येईल. लघुग्रहावरील कमी गुरुत्वाकर्षणामुळे यान अंतराळात भरकटू नये, म्हणून चीन तिथे एका विशेष 'अँकर' (नांगर) तंत्रज्ञानाचा वापर करून यान लघुग्रहाच्या पृष्ठभागावर स्थिर करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news