China Octopus Satellite | चीनच्या ‘ऑक्टोपस’ उपग्रहाची अवकाशात किमया!

China Octopus Satellite
China Octopus Satellite | चीनच्या ‘ऑक्टोपस’ उपग्रहाची अवकाशात किमया!
Published on
Updated on

बीजिंग : चीनच्या एका रोबोटिक ‘ऑक्टोपस आर्म’ असलेल्या उपग्रहाने पृथ्वीच्या खालच्या (जवळच्या) कक्षेत इंधन भरण्याची महत्त्वाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या यशासह चीनने या विशिष्ट तंत्रज्ञानात आपले जागतिक वर्चस्व सिद्ध केले असून, अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ अद्याप याबाबतीत मागे असल्याचे दिसून येत आहे.

‘हुकेडा-2’, ज्याला चीनमध्ये ‘युक्सिंग-3 06’ असेही ओळखले जाते, 16 मार्च रोजी जिऊक्वान सॅटेलाईट लाँच सेंटरमधून प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. हा उपग्रह सध्या पृथ्वीपासून सुमारे 540 किलोमीटर उंचीवर फिरत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी विकसित करण्यात आलेला हा एक प्रात्यक्षिक उपग्रह आहे. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा ऑक्टोपससारखा लवचीक रोबोटिक हात. हा हात स्प्रिंगसारख्या नळ्या आणि केबल्सनी बनलेला असून, तो एका मोटरला जोडलेला आहे. यामुळे हा हात कोणत्याही दिशेला वाकू शकतो आणि वळण घेऊ शकतो. ताशी 27,000 किलोमीटर या प्रचंड वेगाने फिरणार्‍या उपग्रहाशी जुळवून घेण्यासाठी या हाताची रचना अत्यंत सूक्ष्म हालचाली करण्यासाठी करण्यात आली आहे.

एखाद्या अरुंद जागी वस्तू पकडणे, गुंडाळणे किंवा वळवणे यात हा हात तरबेज आहे. 24 मार्च रोजी चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोबोटिक हाताने इंधन भरण्याची पहिली चाचणी यशस्वी केली. सुरुवातीला ही चाचणी दुसर्‍या उपग्रहासोबत केली गेल्याचे वाटले होते; परंतु नंतर प्राप्त झालेल्या छायाचित्रांनुसार, या हाताने स्वतः ‘हुकेडा-2’ उपग्रहावर असलेल्या ‘टार्गेट पोर्ट’ला जोडून ही प्रक्रिया पूर्ण केली. हा प्रायोगिक उपग्रह भविष्यात अवकाशात एक मोठा फुगा तैनात करणार आहे. यामुळे स्पेसएक्सच्या ‘स्टारलिंक’सारख्या उपग्रहांच्या मोठ्या जाळ्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते. अवकाशातील कचरा कमी करणे किंवा उपग्रहांचे आयुष्य वाढवणे या द़ृष्टीने ही एक मोठी झेप मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news