

बीजिंग : चीनच्या शेन्झेन शहरात तंत्रज्ञानाचा एक अद्भुत सोहळा रंगणार आहे. जगातील पहिली ह्युमनॉईड रोबो कॉम्बॅट लीग (मानवाकार रोबोंची लढाई) सुरू झाली असून, यामध्ये लोखंडी फायटर्स एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. रोबोटिक्सच्या क्षेत्रातील चीनची वाढती शक्ती दर्शवणारा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे.
या स्पर्धेतील विजेत्या टीमला 1.44 दशलक्ष डॉलर (सुमारे 12 कोटी रुपये) रोख आणि एक भव्य ‘गोल्ड चॅम्पियनशिप बेल्ट’ देऊन सन्मानित करण्यात येईल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणार्या संघांना एपसळपशअख कंपनीचे ‘ढ800’ रोबो मोफत देण्यात येत आहेत. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला ढ800 रोबो अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यामध्ये 450 छा टॉर्क देणारी मोटर्स बसवण्यात आली आहे, ज्यामुळे तो वेगाने आणि ताकदीने हल्ला करू शकतो. हा रोबो मार्शल आर्टस्मध्ये तरबेज असून, तो ‘साईड किक’ आणि हवेत ‘360-डिग्री रोटेशन’सारखे अवघड मुव्ह्स सहज करू शकतो.
सॉलिड-स्टेट लिथियम बॅटरीमुळे हा रोबो सलग 4 तास हाय-इंटेंसिटी परफॉर्मन्स देऊ शकतो. याची बॉडी ‘एव्हिएशन-ग्रेड’ अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे, जी वजनाला हलकी, पण अत्यंत मजबूत आहे. ही लीग केवळ मनोरंजनासाठी नसून, त्यामागे एक मोठा उद्देश आहे. या लढायांमुळे रोबोंचे मोशन कंट्रोल, डायनॅमिक बॅलन्स आणि इम्पॅक्ट रेझिस्टन्स (आघात सहन करण्याची क्षमता) तपासता येईल. यामुळे तंत्रज्ञानाचा विकास 30 टक्क्यांनी अधिक वेगाने होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, रोबोंना कठीण प्रसंगात कोणत्या समस्या येतात, हे समजून घेणे कंपन्यांना सोपे जाईल.China Robot League
एकीकडे या स्पर्धेचे कौतुक होत असताना, तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, रोबोंच्या अशा लढायांमुळे कंपन्यांचे लक्ष केवळ ‘लढाऊ रोबो’ बनवण्यावर केंद्रित होऊ शकते. यामुळे घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठीच्या रोबोंच्या विकासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. रोबोंचा वापर मानवी कल्याणासाठी आणि फॅक्टरीमधील कामांसाठी वाढवणे जास्त गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.