Chicken Egg vs Duck Egg | कोंबडीच्या आणि बदकाच्या अंड्यात फरक काय?

Chicken Egg vs Duck Egg |
Chicken Egg vs Duck Egg | कोंबडीच्या आणि बदकाच्या अंड्यात फरक काय?
Published on
Updated on

नवी दिल्ली : अंडी हा प्रोटिनचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो आणि वजन कमी करण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. बाजारात कोंबडी आणि बदक या दोन्हींची अंडी सहज उपलब्ध असतात. मात्र, या दोन्ही अंड्यांमधील फरक अनेकांना माहिती नसतो. चव, आकार आणि पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत या अंड्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. आज आपण कोंबडी आणि बदकाच्या अंड्यांमधील फरक जाणून घेऊयात.

बदकाचे अंडे हे सामान्यतः कोंबडीच्या अंड्यापेक्षा आकाराने मोठे असते. त्याचे कवच अधिक जाड आणि मजबूत असल्यामुळे ते जास्त काळ सुरक्षित राहते. याउलट, कोंबडीचे अंडे आकाराने लहान आणि वजनाने हलके असते. या दोन्ही प्रकारची अंडी बाजारात सहज उपलब्ध होत असतात. कोंबडीच्या अंड्यांच्या तुलनेत बदकाच्या अंड्यांमध्ये कॅलरी, प्रथिने आणि फॅटचे प्रमाण अधिक असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, सेलेनियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. दुसरीकडे, कोंबडीच्या अंड्यांमध्ये कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात आणणारे लोक याचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात.

बदकाच्या अंड्यांची चव अधिक गडद आणि क्रीमी मानली जाते. त्यामुळे बेकरी पदार्थ आणि पारंपरिक पाककृतींमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तर कोंबडीच्या अंड्यांची चव सौम्य असल्यामुळे ती रोजच्या आहारात अधिक लोकप्रिय आहेत. खासकरून लहान मुले आणि वृद्ध लोक कोंबडीच्या अंड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. जर तुम्हाला जास्त प्रोटिन आणि ऊर्जा हवी असेल, तर बदकाचे अंडे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, कमी कॅलरीचा आहार घेत असाल किंवा रोज अंडी खात असाल, तर कोंबडीचे अंडे अधिक योग्य ठरते. दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. त्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य अंडे निवडावे, असे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news