Chicago Rat Hole | शिकागोच्या रस्त्यावरील प्रसिद्ध ‘रॅट होल’ उंदरामुळे बनले नाहीच?

Chicago Rat Hole
Chicago Rat Hole | शिकागोच्या रस्त्यावरील प्रसिद्ध ‘रॅट होल’ उंदरामुळे बनले नाहीच?
Published on
Updated on

न्यूयॉर्क : विज्ञान अनेकदा अशा बातम्या घेऊन येते, ज्या केवळ मनोरंजकच नव्हे तर आश्चर्यचकित करणार्‍या असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या बातमीबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात रस्त्यावर असलेल्या एका खड्ड्यापासून होता. वरवर पाहता हा एक साधा खड्डा आहे, परंतु तो अगदी उंदरासारखा दिसत आहे! शास्त्रज्ञांनी जेव्हा यावर संशोधन केले, तेव्हा त्यांना समजले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे.

चित्रात दिसत असलेला हा खड्डा शिकागोच्या एका रस्त्यावरचा आहे. या खड्ड्याचे चित्र पाहून कोणताही माणूस काही काळ थांबून विचार करेल की, ‘अखेर हा खड्डा कसा तयार झाला असेल? आणि तोही अगदी उंदरासारखा दिसणारा?’ याचे उत्तर असे आहे की, हा खड्डा तेव्हा तयार झाला, जेव्हा रस्ता ओला होता. 2024 मध्ये, हे चित्र पहिल्यांदा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावेळी या खड्ड्याला ‘Rat Hole' (उंदराचा खड्डा) असे नाव देण्यात आले होते.

या खड्ड्याच्या चित्राने शास्त्रज्ञांच्या मनात जिज्ञासा निर्माण केली की, हा कसा तयार झाला आणि कोणत्या प्राण्याची ही उमटलेली खूण आहे? शास्त्रज्ञांनी ‘रॅट होल’वर संशोधन सुरू केले आणि ते ‘बायोलॉजी लेटर्स’ नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशितही झाली. त्यांची तपासणी पद्धत खूपच रंजक होती. त्यांनी सर्वप्रथम त्या परिसरात आढळणार्‍या प्राण्यांची माहिती घेतली. एकूण 37 प्रकारच्या प्राण्यांपैकी 29 प्राण्यांना पूर्णपणे नाकारले गेले. शेवटी फक्त 8 प्रजाती शिल्लक राहिल्या. यात ब—ाऊन रॅट (तपकीरी उंदीर), ग्रे स्क्विरल (करडी खार), फॉक्स स्क्विरल इत्यादींचा समावेश होता.

यानंतर, शास्त्रज्ञांनी चित्रांच्या आधारे खड्ड्याचे माप घेणे आणि अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले. अखेरीस, शास्त्रज्ञ कोणत्याही एका प्राण्यावर शिक्कामोर्तब करू शकले नाहीत, कारण कोणताही प्राणी पूर्णपणे जुळत नव्हता. परंतु, ‘ईस्टर्न ग्रे स्क्विरल’ (पूर्वेकडील करडी खार) चा आकार आणि प्रमाण खड्ड्याच्या सर्वात जवळ होते. त्यामुळे शास्त्रज्ञांचे मत आहे की हा खड्डा त्याच खारीचा असू शकतो. कारण शिकागोमध्ये करड्या खारी आढळणे खूप सामान्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news