Cheetah Cubs | जर्मनीच्या प्राणिसंग्रहालयात चित्त्याच्या मादीला झाली ७ पिल्ली!

Cheetah Cubs |
Cheetah Cubs | जर्मनीच्या प्राणिसंग्रहालयात चित्त्याच्या मादीला झाली ७ पिल्ली!
Published on
Updated on

बर्लिन : जर्मनीतील ‘अल्वेतरझू मुन्स्टर’ प्राणिसंग्रहालयात एका चित्त्याच्या मादीने तब्बल ७ पिल्लांना जन्म दिला आहे. ‘अल्वा’ असे नाव असलेली ही मादी आणि ‘सामबेसी’ नावाच्या नर चित्त्याची ही पिल्ली असून, जुलै महिन्यात त्यांचा जन्म झाला आहे. यात एक मादी आणि सहा नरांचा समावेश आहे. सामान्यतः चित्त्यांना एका वेळी ३ ते ५ पिल्ले होतात, त्यामुळे एकाच वेळी ७ पिल्लांचा जन्म होणे ही अतिशय दुर्मीळ घटना मानली जाते.

आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षण आयोगाच्या (आययूसीएन) लाल यादीत चित्त्यांचा समावेश असून, ही प्रजाती धोक्यात येत असल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या प्रजनन कार्यक्रमात या पिल्लांचा जन्म अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जगातील सर्वात वेगवान सस्तन प्राणी असलेल्या चित्त्यांचा ताशी वेग ७० ते ७५ मैल इतका असू शकतो आणि ते अवघ्या ३ सेकंदांत ० ते ६० मैल प्रति तास वेग घेऊ शकतात. सध्या या सातही खोडकर पिलांची काळजी घेण्यात अल्वा व्यस्त असून, प्राणिसंग्रहालयातील हा परिवार पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news