मसाला डोसाच्या किमतीत चक्क विमान प्रवास!

खासगी एयरलाईन्सकडून हा स्वस्तातील प्रवास
cheapest flight ticket india travel
भारतात एक फ्लाईट अतिशय कमी पैशात विमान प्रवासाची संधी देते.Pudhari File Photo
Published on
Updated on

शिलाँग : एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे फ्लाईटच्या तिकिटांचे वाढणारे दर याविषयी सद्यस्थिती काय आहे, हे सर्वश्रुत आहे. फ्लाईटच्या तिकिटाचे दर तर अगदी मिनिटा मिनिटाला बदलत असतात. जितक्या उशिरा बुकिंग, तितका अधिक खिसा रिकामा, हे समीकरण बर्‍याचदा दिसून येते. मात्र, भारतात एक फ्लाईट अशीही आहे, ज्या मार्गावर अतिशय कमी पैशात म्हणजे अगदी एखादा मसाला डोसा घेता येईल, इतक्या कमी पैशात विमान प्रवासाची संधी देते.

हा स्वस्तातील प्रवास काही खासगी एयरलाईन्सकडून

हा स्वस्तातील प्रवास काही खासगी एयरलाईन्सकडून करण्यात येत आहे. या एअरलाईन्सने गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये असलेला जो प्रवास आहे तो फक्त 50 मिनिटांत करू शकता. या विमानात बसून खिडकीतून बाहेर दिसत असलेले सुंदर द़ृश्य पाहू शकतो. या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटू शकतो. गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये खूप कमी अंतर आहे. त्यामुळे या रूटवर विमानाने प्रवास करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. त्याशिवाय एक खासगी कंपनी कमी दरात हा प्रवास करण्याची संधी देते. काही ठरावीक अ‍ॅपचा वापर केला, तर या विमानाने प्रवास करण्यासाठी किती रक्कम खर्च करावी लागते ते तपासल्यानंतर कळेल की, गुवाहाटी ते शिलाँगसाठी असलेले भाडे हे फक्त 400 रुपये आहे. पण, जेव्हा तिथे प्रोमो कोड वापरला तर त्यावर 320 रुपयांची ऑफर मिळते. त्यामुळे फ्लाईटचं तिकीट केवळ 80 रुपये होते. नागरिकांना उड्डायन मंत्रालयाने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यास आणि त्याशिवाय ते परवडणार असेल याचे आदेश दिले होते. 21 ऑक्टोबर 2016 रोजी उडान लाँच करण्यात आले होते. यामुळे भारतातील अनेक ठिकाणांच्या मार्गावरील फ्लाईटची तिकिटांचे दर हे कमी करण्यात आले आणि यामुळेच आता मसाला डोशाच्या किमतीतदेखील या मार्गावर विमान प्रवास शक्य होतो आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news