

लॉस एंजिल्स : आजच्या युगात प्रत्येकाला सुंदर दिसायचंय आणि यासाठी लोक विविध सर्जरी करायला मागेपुढे पाहत नाहीत. वैज्ञानिक प्रगतीमुळे तर आता माणसाला त्याच्या शरीराला हवा तसा आकार देण्याचीही क्षमता प्राप्त झाली आहे. याचसंदर्भात, एक नवीन सर्जरी सध्या चर्चेत आहे, ज्याच्या मदतीने डोळ्यांचा रंग कायमचा बदलता येतो. म्हणजेच, आता निळे, तपकिरी किंवा घारे डोळे मिळवणे केवळ एक स्वप्न नाही, तर ते प्रत्यक्षात आणता येऊ शकते. या शस्त्रक्रियेची क्रेझ इतकी वाढलीय की, ती आता अमेरिकेत एक व्हायरल ट्रेंड बनली आहे. याचे श्रेय लॉस एंजिल्समधील एका नेत्ररोग तज्ज्ञाला जाते.
नेत्ररोग तज्ज्ञ श्रेय लॉस हे या संकल्पनेचे जनक असून, हे सर्व काही लोकांच्या निवडीवर अवलंबून असल्याचे ते सांगतात. डोळ्यांचा रंग बदलण्याची ही शस्त्रक्रिया सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, फेस लिफ्ट आणि बोटॉक्ससारखाच हा एक भाग असल्याचेही त्यांचे मत आहे. नेत्ररोग तज्ज्ञ श्रेय लॉस यांना ही शस्त्रक्रिया कशी केली जाते, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘आम्ही कॉर्नियाजवळ रंग इंजेक्ट करतो. प्रत्येक डोळ्यासाठी या प्रक्रियेला सुमारे 15 ते 20 मिनिटे लागतात आणि सामान्यतः ही सर्जरी करताना भूल दिली जात असल्यामुळे वेदनाही होत नाहीत. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी लोकांना एका डोळ्याला सुमारे 6000 (जवळपास 5 लाख रुपये) खर्च करावे लागतात. म्हणजेच, दोन्ही डोळ्यांसाठी एकूण 12000 (जवळपास 10 लाख रुपये) द्यावे लागतील.’
ही प्रक्रिया खूप सुरक्षित मानली जाते, ज्यामुळे लोकांना भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. याच कारणामुळे ही शस्त्रक्रिया सध्या झपाट्याने ट्रेंड करत आहे. ज्या डॉक्टरने ही शस्त्रक्रिया लोकप्रिय केली, ते डॉ. श्रेय लॉस सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे टिकटॉकवर 3.4 मिलियनपेक्षा जास्त आणि इन्स्टाग्रामवर 3.19 लाख फॉलोअर्स आहेत. 57 वर्षीय नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ब्रायन बॉक्सर वॉचलर यांनीही डोळ्यांचा रंग बदलण्याच्या या प्रक्रियेला दुजोरा देत ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.