प्लेटलेटस् कमी होण्याची कारणे व उपाय

प्लेटलेटस् का कमी होतात व त्यावर आहारातून कशी मात करावी
Causes and solutions for low platelets
प्लेटलेटस् कमी होण्याची कारणे व उपाय.Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सध्याच्या काळात डासांमुळे होणार्‍या आजारांचा धोका वाढलेला आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या डासांमुळे पसरणारे आजार पसरू लागतात. त्यामुळे रुग्णांची प्लेटलेट संख्या कमी होऊ लागते आणि काही परिस्थितींमध्ये ते प्राणघातकही ठरू शकते. प्लेटलेटस् का कमी होतात व त्यावर आहारातून कशी मात करावी याची ही माहिती...

प्लेटलेट संख्या म्हणजे काय?

रक्ताची रचना तीन गोष्टींनी बनलेली असते. लाल रक्तपेशी, पांढर्‍या रक्तपेशी आणि प्लेटलेटस्. साधारणपणे निरोगी शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते. रक्तातील प्लेटलेटस् रक्त गोठण्याचे काम करतात आणि शरीरातून रक्तस्राव रोखतात, त्यांना थ-ोम्बोसाइटस् असेही म्हणतात. शरीरात त्यांची संख्या प्रति मायक्रोलिटर रक्तामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाखांपर्यंत असते. ही संख्या 30,000 पेक्षा कमी झाल्यास नाक, कान, लघवी आणि मल यातून रक्तस्राव सुरू होतो. रक्तातील प्लेटलेटस्ची संख्या जाणून घेण्यासाठी सीबीसी सॉल्ट टेस्ट केली जाते आणि जर त्यांची संख्या कमी असेल तर डॉक्टर व्हिटॅमिन बी 12, सी, फोलेट आणि आयर्नने समृद्ध असलेले खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

प्लेटलेटस् कमी होण्याचे कारण काय?

डेंग्यू : डेंग्यू हा एक धोकादायक संसर्ग आहे व एडीज इजिप्टी नावाच्या डासांच्या दंशाने तो पसरतो. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते आणि त्यामुळे रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवरही खोलवर परिणाम होतो. त्यामुळेच डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यू झाल्यास रक्तस्राव होण्याचा धोकाही वाढतो, डेंग्यूचे डास अनेकदा दिवसा चावतात.

अस्थिमज्जा समस्या : अस्थिमज्जा किंवा कर्करोगाच्या नुकसानीमुळे प्लेटलेटची संख्या देखील कमी होते.

संसर्ग : एचआयव्ही संसर्ग, हिपॅटायटीस सी, मोनोन्यूक्लिओसिस आणि सेप्सिस यांसारख्या आजारांमुळे प्लेटलेटची संख्या देखील कमी होऊ लागते.

गर्भधारणा : गर्भवती महिलांमध्ये प्रीक्लॅम्पसियासारख्या समस्यांमुळे शरीरातील प्लेटलेटची संख्या कमी होऊ लागते.

प्लेटलेटस् कमी झाल्याची लक्षणे :

स्नायू आणि सांधेदुखी

तीव- डोकेदुखी

थकवा आणि अशक्तपणा

डोळे दुखणे

शरीरावर पुरळ उठतात

सौम्य रक्तस्राव

प्लेटलेटस् वाढवण्याचे उपाय :

प्लेटलेटस् वाढवण्यासाठी पपई, डाळिंब, बीटरूट, पालक, गिलोय (गुळवेल) आणि नारळ पाणी यासारख्या गोष्टींचे सेवन करावे. भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, राजमा, टोमॅटो, मसूर डाळही लाभदायक ठरते.

व्हिटॅमिन बी 12, फोलेट, आयर्न आणि व्हिटॅमिन

सी सारखे घटक असलेल्या प्रत्येक पदार्थाचे सेवन

केले पाहिजे.

पालक, ब-ोकोली आणि स्प्राऊटस्सारख्या व्हिटॅमिन के समृद्ध असलेल्या गोष्टी खाव्यात.

जर तुम्ही डेंग्यूचे रुग्ण असाल तर जास्तीत जास्त द्रवपदार्थ घ्या.

लिंबू पाणी, नारळ पाणी आणि ताक प्यायल्याने शरीरातील प्लेटलेटस्ची संख्या वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या