
नवी दिल्ली : मॉर्निंग वॉक किंवा धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे; मात्र धावत असताना काही चुका केल्या तर त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. त्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
धावण्यासाठी चुकीचे फुटवेअर निवडण्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तुमचे पाय, गुडघे आणि सांध्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सांधे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे धावण्यासाठी जे रनिंग शूज असतात त्याचाच वापर करावा. धावण्याच्या आधी वॉर्मअप करणे खूप गरजेचे आहे. स्ट्रेचिंग आणि थोडा व्यायाम केल्याने शरीर मोकळे होते. धावताना शरीराची योग्य स्थिती असणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या स्थितीत धावत असाल, जसे की खांदे झुकवून किंवा पायाची चुकीची स्थिती यामुळं सांध्यावर अवाजवी ताण येतो. त्यामुळे सांधेदुखी आणि अशक्तपणा येतो. खूप जास्त धावल्याने शरीर आणि सांध्यावर दबाव येऊ शकतो. आराम न करता धावल्याने मांसपेशी आणि सांधे कमजोर होऊ शकतात. त्यामुळं गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरालाही पुरेसा आराम देण्याची गरज असते.