सुनीताच्या परतीसाठी 12 मार्चपर्यंत मोहीम

सुनीताच्या परतीसाठी 12 मार्चपर्यंत मोहीम
File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर परतीसाठी यान उपलब्ध नसल्याने अद्याप तिथेच आहेत. आता ‘नासा’च्या या दोन अंतराळवीरांचे लवकरच पृथ्वीवर आगमन होऊ शकतं. ‘नासा’च्या माहितीनुसार, एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ आगामी अंतराळ मोहिमांसाठी त्यांच्या कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. अवकाशात ‘अडकलेल्या’ बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावं, यासाठी हा बदल केला जाणार आहे. त्यांच्या परतीसाठीची मोहीम 12 मार्चपर्यंत होऊ शकते.

या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे. मागच्या आठवड्यात बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आठ महिने पूर्ण झाले आहेत. सुनीता विल्यम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या. नासाच्या वाणिज्यिक चालक दल प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी सांगितलं की, ‘मानवी अंतराळ मोहीम अनेक आव्हानांनी भरलेली असते’ विल्मोर आणि सुनीता विल्यम्स दोघेही उड्डाणानंतर एक आठवड्याने बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलने पृथ्वीवर परतणार होते; पण स्टारलायनरच्या कॅप्सूलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नासाने रिकाम्या कॅप्सूलला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स या दोघांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी ‘स्पेसएक्स’वर सोपवली.

स्पेसएक्सने एका नव्या कॅप्सूलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याच ठरवलं; पण या मिशनच्या लॉन्चिंगला विलंब झाला. त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स यांचा अवकाश स्थानकातील कालावधी वाढला. आता आणखी 720 तासांनी विल्मोर आणि विल्यम्स परत येऊ शकतात. नासाने आता नव्या कॅप्सूलची प्रतीक्षा करण्याऐवजी नव्या मिशनच्या लॉन्चसाठी जुन्या कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्च पर्यंत हे मिशन लॉन्च करण्याचा उद्देश आहे. जुनी कॅप्सूल एका खासगी मिशनसाठी देण्यात येणार होती. यामध्ये पोलंड, हंगेरी आणि भारताचे अंतराळवीर होते. या मिशनचे वेळापत्रक बदलून पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स या दोघांची लवकर घरवापसी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news