

लंडन : जगातील सर्वात महागड्या व आलिशान निवासस्थानांपैकी एक इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये आहे. ‘बकिंगहॅम पॅलेस’ असे या घराचे नाव आहे. बकिंगहॅम पॅलेस हे ब्रिटिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. या राजवाड्यात 100, 200 किंवा 400 नाही तर तब्बल 775 खोल्या आहेत. 78 बाथरूम आणि 1500 हून अधिक दरवाजे आहेत. 775 खोल्यांपैकी 52 खोल्या राजघराण्यासाठी आहेत. 188 खोल्या पाहुण्यांसाठी आहेत, 92 खोल्या नोकर आणि कर्मचार्यांसाठी आहेत. हा राजवाडा ब्रिटिश राजघराण्याची वैयक्तिक मालमत्ता नाही. बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश सरकारच्या मालकीचा आहे. म्हणजेच, हा राजवाडा ब्रिटिश सरकारच्या मालकीचा आहे.
ज्या जमिनीवर हा राजवाडा बांधला आहे ती जमीन पूर्वी मलबेरी गार्डन होती. हा राजवाडा 108 मीटर लांब आणि समोरून 120 मीटर रुंद आहे. राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ 77 हजार चौरस मीटर आहे. राजवाड्यात 1514 दरवाजे आणि 760 खिडक्या आहेत. राजवाड्यात 350 हून अधिक घड्याळे बसवण्यात आली आहेत. राजवाड्याच्या तळघरात एक एटीएम मशीन देखील बसवण्यात आली आहे, जी राजघराण्याचे वैयक्तिक एटीएम मशिन आहे. तीनशे वर्षांपूर्वी, बकिंगहॅमच्या ड्यूकने ते घर म्हणून बांधले.
1837 मध्ये राणी व्हिक्टोरियाने पहिल्यांदाच या राजवाड्याला आपले घर बनवले. या राजवाड्यात वीज येण्यासाठी अनेक वर्षे लागली. 1883 मध्ये, बकिंगहॅम पॅलेसमध्ये पहिल्यांदाच वीज सुरू झाली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये एकूण 800 कर्मचारी काम करतात. या पॅलेसमध्ये स्वतःचे वैयक्तिक चॅपल, पोस्ट ऑफिस, हॉस्पिपटल आणि सिनेमा हॉल आहे. 40 एकरांवर पसरलेले एक पार्क, हेलिकॉप्टरसाठी एक हेलिपॅड आणि एक तलाव आहे. एका अहवालानुसार, बकिंघम पॅलेसची किंमत 4.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 40 लाख कोटी रुपये आहे.