Brain like sensor technology | मानवी मेंदूसारखा विचार करणारा ‘स्मार्ट सेन्सर’ विकवित

बेडकापासून घेतली प्रेरणा : भारतीय संशोधकांचे यश
Brain like sensor technology |
Brain like sensor technology | मानवी मेंदूसारखा विचार करणारा ‘स्मार्ट सेन्सर’ विकवित
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यांनी असा एक प्रगत ‘सेन्सर’ तयार केला आहे जो केवळ वातावरणातील आर्द्रता (ओलावा) मोजणार नाही, तर मानवी मेंदूंप्रमाणे विचार करण्याची आणि माहिती लक्षात ठेवण्याची क्षमताही ठेवतो.

सध्या वापरात असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा सेन्सर्स हे वेगवेगळ्या भागांवर अवलंबून असतात. यामध्ये माहिती गोळा करण्यासाठी सेन्सर, ती समजून घेण्यासाठी प्रोसेसर आणि साठवण्यासाठी मेमरी असे तीन स्वतंत्र विभाग असतात. यामुळे ऊर्जेचा वापर जास्त होतो आणि प्रक्रियेचा वेगही मंदावू शकतो. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेला हा नवा सेन्सर हे तिन्ही कामे एकाच ठिकाणी करतो, ज्यामुळे तो अधिक वेगवान आणि कार्यक्षम ठरतो. ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च’च्या संशोधकांनी हा ‘न्यूरोमॉर्फिक सेन्सर’ तयार केला आहे. विशेष म्हणजे, हा सेन्सर ‘क्रिकेट फ्रॉग’ या बेडकाच्या प्रजातीपासून प्रेरित आहे. पाऊस किंवा जास्त आर्द्रता असताना बेडकांची हालचाल वाढते आणि ते वातावरणाशी जुळवून घेतात. निसर्गातील याच तत्त्वाचा वापर शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानात केला आहे.

नव्या तंत्रज्ञानाचे फायदे काय?

या नवीन संशोधनामुळे भविष्यात अनेक स्मार्ट उपकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील :

ऊर्जेची बचत : हे सेन्सर्स अतिशय कमी विजेवर जास्त काम करू शकतील.

स्मार्ट एअर कंडिशनिंग : हवामानातील बदल ओळखून स्वतःहून तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करणारे एसी किंवा ह्युमिडिटी कंट्रोल सिस्टीम तयार करता येतील.

हेल्थ डिव्हाइसेस : अंगावर परिधान करता येण्याजोगी आरोग्य उपकरणे शरीराभोवतीचे वातावरण अधिक अचूकपणे समजून घेऊ शकतील.

एआय आणि IoT साठी महत्त्वाचे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या क्षेत्रांत जिथे कमी ऊर्जेत वेगवान कामाची गरज असते, तिथे हे तंत्रज्ञान ‘गेम-चेंजर’ ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news