Bonobo Imitation Behavior
Bonobo Imitation Behavior | मानवाप्रमाणेच बोनोबोही करतात ‘नक्कल’

Bonobo Imitation Behavior | मानवाप्रमाणेच बोनोबोही करतात ‘नक्कल’

शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच मांडले पुरावे
Published on

वॉशिंग्टन : मानवाचा सर्वात जवळचा नातेवाईक मानल्या जाणार्‍या ‘बोनोबो’ प्रजातीच्या माकडांमध्येही माणसांसारखीच काल्पनिक खेळ खेळण्याची किंवा ‘नक्कल’ करण्याची क्षमता असल्याचे शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. आजवर ही क्षमता केवळ मानवामध्येच असल्याचे मानले जात होते.

‘सायन्स’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत गुरुवारी (दि. 5) प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, ‘कांझी’ नावाच्या एका विशेष बोनोबोने दोन वर्षांच्या लहान मुलांप्रमाणेच काल्पनिक चहापानाच्या कार्यक्रमात रस दाखवला. कांझीला इंग्रजी भाषा काहीशी समजत असे. या प्रयोगादरम्यान त्याने काल्पनिक द्राक्षे आणि ज्यूस यांचा मग ठेवला, जे प्रत्यक्षात तिथे अस्तित्वातच नव्हते. जरी कांझीने स्वतःहून या खेळाची सुरुवात केली नसली, तरी इतरांच्या काल्पनिक कृतींचे अनुसरण करण्याची त्याची क्षमता थक्क करणारी होती.

यामुळे हे सिद्ध झाले की, काल्पनिक वस्तू आणि प्रसंग कल्पनेत रंगवण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक घटक या प्राण्यांमध्येही आहेत. या अभ्यासाचे सह-लेखक आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक क्रिस्टोफर कृपेन्ये यांनी सांगितले की, ‘हे संशोधन खरोखरच थक्क करणारे आहे. जे गुण केवळ मानवी विकासाचे वैशिष्ट्य मानले जायचे, ते आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्येही (बोनोबो) दिसून आले आहेत. याचा अर्थ असा की, प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टींची कल्पना करण्याची मानवी क्षमता, मानवी पूर्वज आणि बोनोबो 60 लाख वर्षांपूर्वी वेगळे होण्याआधीच विकसित झाली असावी.

’ यापूर्वीही जंगलात किंवा बंदिस्त अवस्थेत असलेल्या वानरांमध्ये अशा प्रकारच्या कृती दिसून आल्या होत्या. उदाहरणार्थ, गिनीमधील एका 3 वर्षांच्या चिम्पांझीने मानवनिर्मित पानाच्या गादीशी खेळताना ती डोक्यावर ठेवली होती. एका बोनोबोने फोटोंमधील ब्ल्यूबेरी ही फळे खरी समजून ‘तोडण्याचा’ आणि ‘खाण्याचा’ प्रयत्न केला होता. परंतु, हे प्राणी त्या वस्तूंना खरे समजत होते की केवळ नाटक करत होते, याबाबत स्पष्टता नव्हती. शास्त्रज्ञ अमालिया बास्तो आणि क्रिस्टोफर कृपेन्ये यांनी नियंत्रित प्रयोगाद्वारे ‘प्राणी खरोखरच नाटक करू शकतात का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news