Black Hole Cosmic Winds | विक्रमी वेगाने ‘कॉस्मिक वारे’ फेकत असलेले कृष्णविवर

Black Hole Cosmic Winds
Black Hole Cosmic Winds | विक्रमी वेगाने ‘कॉस्मिक वारे’ फेकत असलेले कृष्णविवरPudhari File Photo
Published on
Updated on

अ‍ॅमस्टरडॅम : खगोलशास्त्रज्ञांनी एका महाकाय कृष्णविवराची नोंद घेतली आहे, जो विक्रमी वेगाने ‘कॉस्मिक वारे’ उत्सर्जित करीत आहे. ‘एनजीसी 3783’ नावाच्या सर्पिल आकाशगंगेच्या मध्यभागी, पृथ्वीपासून 135 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या या कृष्णविवराने प्रचंड मोठी एक्स-रे ज्वाला उत्सर्जित केल्यानंतर संशोधकांचे लक्ष वेधून घेतले. ही ज्वाला शांत झाल्यावर, तिने आपल्या मागे 37,000 मैल प्रति सेकंद (60,000 किलोमीटर प्रति सेकंद) पेक्षा अधिक वेगाचे वारे सोडले, जो प्रकाशाच्या वेगाच्या एक-पंचमांश इतका आहे.

‘एखाद्या कृष्णविवराला इतक्या वेगाने वारे तयार करताना आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नाही,‘ असे नेदरलँडस्मधील स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमधील खगोलशास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे प्रमुख लिये गु यांनी एका निवेदनात सांगितले. लिये आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एनजीसी 3783 च्या सक्रिय आकाशगंगेच्या केंद्रकाचा अभ्यास करत होते. हा केंद्रक म्हणजे आकाशगंगेतील ‘खाद्य’ खाणार्‍या महाकाय कृष्णविवराभोवतीचा तेजस्वी आणि क्रियाशील प्रदेश असतो.

या भागातून अचानक ज्वाला बाहेर पडतात आणि पदार्थाचे फवारे व वारे अंतराळात फेकले जातात. संशोधकांचा असा विश्वास आहे की, त्यांनी निरीक्षण केलेला तीव- एक्स-रे स्फोट आणि त्यानंतरचे वादळ हे कृष्णविवराच्या गुंतलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे झाले, जे अचानक उलगडले. या टीमने या प्रक्रियेची तुलना पृथ्वीच्या सूर्याशी केली आहे. आपल्या सूर्याच्या चुंबकीय रेषा गुंताळल्यानंतर आणि तुटल्यानंतर, तो कोरोना मास इजेक्शन नावाचे प्लाझ्माचे मोठे उद्रेक करतो. तथापि, या प्रकरणात, महाकाय कृष्णविवराचे वस्तुमान 30 दशलक्ष सूर्यांच्या इतके आहे. त्यामुळे त्याचे स्फोट आणि उत्सर्जन ‘कल्पना करण्यापलीकडे खूप मोठे आहे,’ असे टीमचे सदस्य आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे खगोलशास्त्रज्ञ मॅटिओ ग्वाइनाझी यांनी निवेदनात म्हटले. (उदाहरणार्थ, नुकत्याच झालेल्या कोरोना मास इजेक्शनमधील वार्‍याचा वेग केवळ 930 मैल, किंवा 1,500 किमी, प्रति सेकंद इतका होता.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news