

नवी दिल्ली ः निसर्गामध्ये अनेक अनोखे पक्षी आहेत. आपण ज्या पक्ष्याबद्दल चर्चा करणार आहोत तो जगातील सर्वात लहान पक्षी आहे. त्याच्या सौंदर्यानेच नव्हे तर त्याच्या पंखांच्या फडफडण्याच्या वेगानेही तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा पक्षी फक्त एका सेकंदात 200 वेळा पंख फडफडवतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला नक्कीच अवाक करेल. त्याचे पंख इतक्या वेगाने फडफडतात की हेलिकॉप्टरचे पातेही मागे पडतात.
जगातील सर्वात लहान आणि सर्वात अद्वितीय पक्ष्याला ‘हमिंगबर्ड’ म्हणतात. त्याला ‘गुंजन’ म्हणूनही ओळखले जाते. हा पक्षी अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. या पक्ष्याचे हृदय एका मिनिटाला 1200 वेळा धडधडते. त्याचे वजनही खूपच कमी आहे, फक्त 20 ग्रॅम वजनाचे आहे. या पक्ष्याचा सर्वात आश्चर्यकारक पैलू म्हणजे त्याचे उड्डाण... तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा पक्षी उलटा सुद्धा उडू शकतो. हमिंगबर्डस् 12 वर्षांपर्यंत जगतात. ते हेलिकॉप्टरप्रमाणे उडताना एकाच ठिकाणी स्थिर राहू शकतात.