बिल गेटस्यांना मेंदूचा ‘एस्पर्जेर सिंड्रोम’

फोएबे गेटस्ने आपला पॉडकास्ट कॉल हर डॅडीमध्ये यासंदर्भात खुलासा
bill-gates-asperger-syndrome-revelation
बिल गेटस्यांना मेंदूचा ‘एस्पर्जेर सिंड्रोम’Pudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेटस् यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची लेक फोएबे गेटस्ने आपला पॉडकास्ट कॉल हर डॅडीमध्ये यासंदर्भात खुलासा केलाय. बिल गेटस् यांना एस्पर्जेर सिंड्रोम ( Asperger' s Syndrome) आहे. बिल गेटस् यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात याचा थोडा संकेत दिला होता. लहानपणी त्यांना सामाजिक संकेत समजण्यास अडचण येत होती. काही विषयांमध्ये त्यांना जास्त रस होता. ते अजूनही कधीकधी पाय हलवत राहतात, असेही लेकीने पॉडकास्टमध्ये सांगितले; पण एस्पर्जेर सिंड्रोम म्हणजे काय? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वेबएमडीच्या अहवालानुसार, एस्पर्जेर सिंड्रोम हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. जो आता सामान्यतः ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) शी संबंधित असल्याचे मानले जाते. एस्पर्जेर सिंड्रोम सामान्यतः बालपणात दिसून येतो; पण त्याची लक्षणे मूल 3 ते 9 वर्षांचे असताना स्पष्टपणे दिसून येतात. या सिंड्रोमने ग्रस्त मुले सामाजिक कार्यात स्वतःला सहभागी करून घेऊ शकत नाहीत. तसेच एक निश्चित दिनचर्या पाळू शकत नाहीत. या विकारामुळे लोक इतरांशी संवाद साधण्यात आणि भावनिक अभिव्यक्तीमध्ये मागे पडतात. अशा लोकांचा बुद्ध्यांक चांगला असतो पण त्यांना एकटेपणा जाणवतो.

एस्पर्जेर सिंड्रोमच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया. याने ग्रस्त असलेल्या लोकांना सामाजिक संकेत समजण्यास अडचण येते, डोळ्यांशी संपर्क साधण्याची कमतरता असते, एकतर्फी संभाषण, एकाच विषयात जास्त रस असतो. अशा व्यक्तींना दिनचर्येतील बदल अजिबात आवडत नाही. मग ते वारंवार वेगवेगळे वर्तन करतात. अशी मुले सहसा इतरांपासून अलिप्त दिसतात आणि त्यांना मित्र बनवणे कठीण जाते. त्यांच्यातील भाषेचा विकास सामान्य असला तरी त्यांची बोलण्याची पद्धत असामान्य किंवा एकरस असू शकते, असे डॉक्टर सांगतात. एस्पर्जेर सिंड्रोमची नेमकी कारणे अद्याप निश्चित केलेली नाहीत.

हा सिंड्रोम अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या संयोजनामुळे असू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, एस्पर्जेर असलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांना न्यूरोडेव्हलपमेंटल किंवा मानसिक आरोग्य समस्या असण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान होणारे संसर्ग, गर्भाशयात मेंदूच्या विकासातील असामान्यता किंवा जन्मावेळी ऑक्सिजनची कमतरता हीदेखील या सिंड्रोमची संभाव्य कारणे असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. ही एक अनुवांशिक आणि न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. म्हणून ती पूर्णपणे रोखता येत नाही. असे असले तरी गर्भधारणेदरम्यान चांगले खाणे, संसर्ग टाळणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे यामुळे एस्पर्जेर सिंड्रोमचा धोका कमी करता येत असल्याचे डॉक्टर सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news