Biggest Fish Species | पंधरा मोटारसायकलपेक्षा जास्त वजन असलेला मासा

Biggest Fish Species
Heaviest Fish | पंधरा मोटारसायकलपेक्षा जास्त वजन असलेला मासा
Published on
Updated on

लंडन ः जगात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांवर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. यापैकीच एक आहे ‌‘मोला मोला‌’ नावाचा खादाड मासा. हा मासा पाहिल्यानंतर तो खरोखर पृथ्वीवर अस्तित्वात आहे, यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. काही लोक त्याला ‌‘समुद्री राक्षस‌’ म्हणतात, तर काहीजण त्याला ‌‘निसर्गाचा चमत्कार‌’ मानतात. हा मासा म्हणजे ‌‘ओशन सनफिश‌’ असून, हा जगातील सर्वात वजनदार ‌‘अस्थि-मासा‌’ (Bony Fish) आहे. याचे वजन इतके जास्त आहे की, जर तुम्ही 15 मोटारसायकली एका रांगेत उभ्या केल्या, तरी त्यांचे एकत्रित वजनही या माशाच्या वजनाएवढे भरणार नाही!

या प्रचंड माशाचे वैज्ञानिक नाव ‌‘मोला मोला‌’ असे आहे. ओशन सनफिश जगातील सर्वात अनोख्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या माशांपैकी एक आहे. याचे शरीर गोलाकार आणि चपटे असते. या माशाची लांबी सुमारे 3 मीटरपर्यंत असू शकते आणि त्याचे वजन 2,500 किलोपर्यंत असू शकते. ओशन सनफिशबद्दलची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचे शरीर हाडांनी बनलेले असते. याच कारणामुळे याला ‌‘अस्थि-मासा‌’ (Bony Fish) या श्रेणीत गणले जाते.

साधारणपणे, इतक्या मोठ्या आकाराचे मासे हे कार्टिलेज म्हणजेच मऊ हाडांचे बनलेले असतात. मात्र, त्याच्या जड आणि घन सांगाड्यामुळे हा ओशन सनफिश इतर सर्व सागरी जीवांपेक्षा वेगळा ठरतो. म्हणूनच याला जगातील सर्वात वजनदार ‌‘अस्थि-मासा‌’ म्हटले जाते. हा मासा बहुतेक करून अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरांच्या खोल भागात आढळतो. इतका प्रचंड वजनदार असूनही हा मासा माणसांसाठी धोकादायक नाही. उलट, तो अत्यंत शांत स्वभावाचा असतो. ओशन सनफिश (मोला मोला) हा मुख्यतः जेलीफिश खातो. जेलीफिशमध्ये पोषणाची कमतरता असल्याने, या माशाला सतत भूक लागलेली असते आणि तो सतत शिकार करत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news