कॅलिफोर्निया : खगोलीय घटना या शास्त्रज्ञांबरोबरच सर्वसामान्य लोकांचीही उत्सुकता वाढवत असतात. मात्र, विज्ञानात जसजशी प्रगती होत आहे, तसतसे अवकाशाबाबत रोज नवी माहितीही मिळू लागली आहे. शास्त्रज्ञ सध्या एका महाकाय लघुग्रहावरून हैरान बनले आहेत. हा लघुग्रह मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या मध्ये चकरा मारत आहे. तसे पाहिल्यास या लघुग्रहाचा शोध दीडशे वर्षांपूवीच लागला होता, असे म्हणतात. मात्र, या लघुग्रहाच्या अद्भूत संरचनेवरून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित बनले आहेत. हा एक धातूचा आणि मोठा लघुग्रह आहे.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने या लघुग्रहाचे संशोधन करण्यासाठी एक अवकाश यान पाठविले आहे. असेही म्हटले जात आहे की, या लघुग्रहाच्या संशोधातून मिळणार्या माहितीने सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल सध्याची धारणाही बदलू शकते. जानेवारी 2026 मध्ये सायकी (झीूलहश ) नामक या लघुग्रहावर नासाचे यान पोहोचण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय म्हणजे झीूलहश नामक या लघुग्रहाचा शोध 17 मार्च 1852 रोजी लावण्यात आला होता. याचा शोध इटलीचे खगोल शास्त्रज्ञ एनिबल डी. गॅस्पारिस यांनी लावला होता. हा एक विशालकाय धातूचा पिंड आहे. मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या अॅस्ट्रॉईड बेल्टमध्ये लाखो लघुग्रह आहेत. मात्र, केवळ एक टक्का लघुग्रह झीूलहश च्या गटातील आहेत.
झीूलहश नामक या लघुग्रह आपल्या हिमालयापैक्षाही 25 पटीने मोठा आहे. त्याचा एकूण व्यास 230 किलोमीटर इतका असून तो 100 टक्के शुद्ध धातूने बनला आहे. याच्या संशोधनाने सूर्यमालेच्या निर्मितीसंदर्भात अधिक माहिती मिळू शकते.