अ‍ॅनिमियाच्या समस्येवर ‘हा’ आहार गुणकारी

महिलांना अ‍ॅनिमियाच्या समस्येला तोंड द्यावे लागते
Best Foods to Eat If You Have Anemia
अ‍ॅनिमियाच्या समस्येवर ‘हा’ आहार गुणकारीPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : अनेक लोकांना, विशेषतः महिलांना अ‍ॅनिमियाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेला ‘अ‍ॅनिमिया’ म्हणतात. अशक्तपणामध्ये, ऑक्सिजन शरीराच्या ऊतींपर्यंत पोहोचत नाही, कारण लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, त्वचा फिकट होते आणि हृदयाचे ठोके वाढतात. डोकेदुखी व चक्कर येणे, हात पाय थंड पडणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय अशक्तपणामुळे म्हणजेच रक्ताच्या कमतरतेमुळे भूक लागत नाही आणि अन्नाला विशेष चव लागत नाही. जर तुम्हाला ही सर्व लक्षणे दिसत असतील तर काही गोष्टींचा आहारात समावेश करावा, असे तज्ज्ञ सांगतात. हे पदार्थ खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात, तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे की बीट, पालक, मसूर, हरभरा, राजमा, तीळ, सोयाबीन,अंडी, चिकन, मटण इ. त्यामध्ये भरपूर लोह असते आणि हे पदार्थ खाल्ल्याने रक्त वेगाने वाढते. व्हिटॅमिन-सी हे हिमोग्लोबिन वाढवते आणि अनेक आजारांपासून बचाव करते. त्यामुळे संत्री, लिंबू, शिमला मिरची, टोमॅटो, द्राक्षे, ब्लॅकबेरी, आवळा इत्यादींचा तुमच्या खाण्याच्या दिनक्रमात समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. डाळिंबात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे रक्तवर्धक फळ मानले जाते. यात दाहविरोधी घटक असतात. डाळिंबाच्या रसामध्ये असलेले लोह शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. डाळिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन-सी असते जे वृद्धत्व विरोधी म्हणूनही काम करते. नाश्त्यापूर्वी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी सामान्य होते. दुधामध्ये व्हिटॅमिन बी 12, रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2) आणि नियासिन (व्हिटॅमिन बी 3) असते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला अ‍ॅनिमियाचा त्रास होत असेल, तर आजपासूनच दूध प्यायला सुरुवात करा, असे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news