Ridge Gourd vegetable benefits | उन्हाळ्यात दोडक्याची भाजी ठरते लाभदायक

Dodka vegetable benefits |
Ridge Gourd vegetable benefits | उन्हाळ्यात दोडक्याची भाजी ठरते लाभदायक
Published on
Updated on

नवी दिल्ली : दोडक्याची भाजी म्हटलं की, अनेक लोक नाक मुरडतात. मात्र, ही भाजी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, विशेषतः उन्हाळ्यात. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्याचा परिणाम हा शरीरावर होत असतो आणि त्यासोबतच पचनाच्या समस्यांचा देखील सामना करावा लागतो. अशावेळेस आरोग्यतज्ज्ञ दोडक्याची भाजी खाण्याची शिफारस करतात. हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे. तसेच ही उन्हाळ्याच्या हंगामातील भाजी नियमित सेवन केल्याने केवळ पचनसंस्थाच मजबूत होत नाही, तर शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील टाळता येते.

दोडका ही एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारी आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी उन्हाळ्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते दोडक्याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता टाळण्यास आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. दोडक्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ही भाजी सेवन करण्याचे आरोग्याला पोषक तत्वे मिळतात. उन्हाळ्यात दोडका खाणे आरोग्यासाठी वरदान ठरते. कारण दोडक्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.

दोडका ही एक हलकी आणि सहज पचणारी भाजी आहे. त्यातील फायबर पचनसंस्थेला बळकट करते आणि बद्धकोष्ठता, गॅस व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते. आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, पित्ताशयाचा विकार संतुलित ठेवण्यासाठी दोडका उपयुक्त ठरतो. ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी दोडक्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. दोडक्याची भाजी ताप, खोकला आणि पोटातील जंत दूर करण्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. दोडका शरीराला थंडावा देतो. त्यामुळे उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यास मदत होते. दोडक्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस् त्वचा निरोगी ठेवतात आणि उन्हामुळे होणार्‍या मुरुमे, पुरळ आणि खाज यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news