Healthy diet flowers | ‘या’ फुलांचा आहारातील समावेश आरोग्यासाठी गुणकारी

Healthy diet flowers |
Healthy diet flowers | ‘या’ फुलांचा आहारातील समावेश आरोग्यासाठी गुणकारी
Published on
Updated on

फुलांचा वापर आपण प्रामुख्याने देवाची पूजा, सजावट किंवा कोणाला तरी भेट देण्यासाठी करतो; पण तुम्हाला माहीत आहे का की, काही सुंदर फुले आपण खाऊदेखील शकतो? हो, हे अगदी खरे आहे. ही फुले केवळ दिसायलाच आकर्षक नसतात, तर आरोग्यासाठीही ती अत्यंत गुणकारी आहेत. या फुलांची माहिती...

गुलाब : गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर गुलकंद, सरबत आणि मिठाईमध्ये केला जातो, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्या विविध पदार्थांत चव वाढवण्यासाठी वापरल्या जातात.

जास्वंद : जास्वंदाच्या फुलाचा वापर फक्त पूजेसाठीच मर्यादित नाही. या फुलांपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी उत्तम असतो. हा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

भोपळ्याची फुले : बंगाल आणि बिहारमध्ये भोपळ्याच्या फुलांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. येथील लोक भोपळ्याची फुले बेसनात बुडवून त्याचे कुरकुरीत भजी (पकोडे) बनवतात, जे चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात.

झेंडूचे फूल : झेंडूच्या पाकळ्यांचा वापर प्रामुख्याने कोशिंबीर (सॅलड) सजवण्यासाठी आणि त्याला रंग देण्यासाठी केला जातो. झेंडूमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंटस् असतात, जे आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.

केळीचे फूल : दक्षिण भारतात केळीच्या फुलाचा वापर अन्नामध्ये आवर्जून केला जातो. या फुलांची भाजी बनवली जाते. केळीच्या फुलामध्ये फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते, जे शरीरासाठी पौष्टिक आहे.

लॅव्हेंडर : लॅव्हेंडर फुलांचा वापर केक, कुकीज आणि चहा बनवण्यासाठी केला जातो. लॅव्हेंडरचा सुगंध आणि त्याचे सेवन केल्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news