Pear Fruit : पावसाळ्यात मिळणारे ‘हे’ फळ आरोग्यदायी

पावसाळ्यात नाशपाती खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Benefits Of Pear Fruit
नाशपाती हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.Pudhari File hoto

पावसाळ्यात, विशेषतः आषाढ-श्रावण महिना सुरू होताच नाशपाती हे फळ बाजारात मिळण्यास सुरुवात होते. त्याला इंग्रजीत ‘पिअर’ असे म्हणतात. ‘पिअर’ हे नाव त्याच्या आकारावरून पडले आहे. हे फळ वरच्या बाजूला निमुळते आणि खाली लंबगोलाकार असते. नाशपाती हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते. पावसाळ्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ युक्त फळे आणि भाज्या खाण्याचे सल्ले दिले जातात. कारण, या ॠतुमध्ये आजार वाढत असतात. याकरिता योग्य आहार असणे आवश्यक असते. पावसाळ्यात आजाराचा धोका कमी करण्यासाठी नाशपाती मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ शिवाय पोटॅशियम, फोलेट, कॉपर आणि मॅगनीज असते. जाणून घ्या या फळाचे फायदे...

मधुमेह नियंत्रित करते

नाशपाती मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. नाशपातीमध्ये एंथोसायनिन असते. जे अँटिऑक्सीडेंटचे काम करते आणि मधुमेहाचा धोका कमी करते.

हृदयासाठी फायदेशीर

नाशपातीमध्ये जे पोषकतत्वे असतात ते हृदयाला आरोग्यदायी ठेवतात. नाशपातीमध्ये प्रोसायनिडिन असते, जे एक अँटिऑक्सीडेंटचे काम करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.

सुज कमी करते

नाशपाती मध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते जे शरीराची सूज कमी करण्यासाठी मदत करते. तसेच नाशपातीमध्ये फ्लेवोनोइड्स अँटिऑक्सीडेंट असतात.

पाचनतंत्र मजबूत बनवते

नाशपातीमध्ये भरपूर फाइबर असते. ज्यामुळे पोट आणि पाचन संबंधित समस्या दूर होतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नाशपाती जरूर खावे.

वजन कमी करण्यासाठी मदत करते

नाशपातीचे सेवन केल्यास वजनदेखील कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे भूक कमी लागते. नासपती खाल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

रक्ताभिसरण

नाशपातीमध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि अशक्तपणा, थकवा इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तासोबतच योग्य प्रमाणात ऑक्सिजनही शरीरात पोहोचतो. त्यामुळे सर्व अवयव योग्य प्रकारे काम करू शकतात.

विषारी घटक बाहेर काढते

नाशपाती हे रसाळ फळ आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे आतड्यांमधून आणि यकृतातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. याच्या मदतीने तुमचे शरीर दररोज स्वच्छ केले जाऊ शकते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातून सोडियम काढून टाकते आणि रक्तदाबाची समस्या टाळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news