आईसलँडमधील ‘त्या’ ज्वालामुखीचा होणार उद्रेक?

या ज्वालामुखीच्या आसपास गेल्या काही दिवसांमध्ये भूगर्भीय हालचाली अचानक वाढल्या
bardarbunga volcano eruption threat in iceland
आईसलँडमधील ‘त्या’ ज्वालामुखीचा होणार उद्रेक?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : आईसलँडमधील बार्डारबुंगा ज्वालामुखीचा मोठा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. या ज्वालामुखीच्या आसपास गेल्या काही दिवसांमध्ये भूगर्भीय हालचाली अचानक वाढल्या आहेत. केवळ पाच तासांमध्येच 130 पेक्षाही अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. या घटना 14 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा भूकंपाचा धक्का 5.1 रिश्टर स्केलचा होता.

बार्डारबुंगा ज्वालामुखी हा आईसलँडमधील सर्वात विशाल ज्वालामुखींपैकी एक आहे. या परिसरात आतापर्यंत अनेक शक्तिशाली ज्वालामुखी घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी घटना अलीकडेच म्हणजे 2014-15 दरम्यान झाली होती. त्यावेळी 300 वर्षांच्या काळातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला होता. आईसलँडच्या हवामान विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार बार्डारबुंगा सुमारे 190 किलोमीटरच्या अंतरापर्यंत पसरला आहे. तेथील केंद्रीय स्ट्रॅटोव्होल्कॅनो बहुतांशी बर्फाने आच्छादीत आहे. त्यामध्येच एक अतिशय मोठा कॅल्डेरा आहे जो एका ग्लेशियरने भरला आहे. सध्या बार्डारबुंगामध्ये असामान्य हालचाली दिसून येत आहेत; मात्र त्याबाबतचे अचूक भाकित करणे सध्या कठीण आहे; मात्र 2014 च्या सुमारास उद्रेकापूर्वी जशा हालचाली सुरू होत्या, तशाच आता तिथे सुरू आहेत. जर काल्डेराच्या आत स्फोट झाला तर त्यामुळे ग्लेशियर फूटू शकते. त्यामुळे पूर आणि राख उत्सर्जनाने गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सध्या संशोधक त्याकडे लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news