बँकॉकमधील रस्ते स्वच्छ करणारी महिला बनली मॉडेल

महिलेचे नशीब एका फोटोने पालटलं
Bangkok woman model
बँकॉकमधील रस्ते स्वच्छ करणारी महिला बनली मॉडेल
Published on
Updated on

बँकॉक ः थायलंडच्या बँकॉक शहरातील रस्ते स्वच्छ करणारी एक साधीसुधी महिला एका क्षणात सोशल मीडियाची स्टार बनली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. नोप्पाजित ‘मीन’ सॉमबूनसेट (वय 28) ही दोन मुलांची सिंगल आई गेल्या एका वर्षापासून रस्ते झाडण्याचं काम करत होती. पण, 14 मार्च रोजी तिचं नशीब एका फोटोने पालटलं. रशियन फोटोग्राफर सेम्योन रेजचिकोवने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर याओवरत रोडवरील मीनचा एक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला. तिचे गोड स्मितहास्य आणि नैसर्गिक सौंदर्य थायलंडच्या टिकटॉक यूजर्सना भलतंच भावलं. काहींनी तर तिला ‘मॉडेल व्हायला हवं!’ असंही म्हटलं आणि आता ती खरोखरच मॉडेल बनली आहे!

टिकटॉकवरील फोटो व व्हिडीओने ती थायलंडमधील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आणि अनेक न्यूज चॅनेल्सने तिची मुलाखत घेतली. या लोकप्रियतेनंतर थायलंडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट नॉन्ग चैट (चटचाई पीनफापिचर्ट) यांनी मीनला एक खास मेकओव्हरसाठी आमंत्रित केलं. त्यांनी तिला थाई हॉरर फिल्म ‘आर्ट ऑफ द डेविल 2’ (2005) मधील रहस्यमय आणि आकर्षक भूमिका ‘पनोर’ मध्ये साकारलं. या भूमिकेचं मूळ कलाकार नपकपफा ‘मामी’ नकप्रसिट्टे हिने साकारलं होतं. नॉन्ग चैटच्या मते, मीनच्या चेहर्‍यावरील भाव आणि तिचं व्यक्तिमत्त्व हे मामीशी खूप मिळतंजुळतं असल्यामुळे त्यांनी तिला ‘पनोर’चा लूक दिला. पारंपरिक थाई पेहराव, खास हेअरस्टाईल आणि मेकअपमुळे मीनचा संपूर्ण लूकच बदलून गेला आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिची चर्चा सुरू झाली. मीनच्या नव्या रूपावर नेटकर्‍यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं. काहींनी लिहिलं, ‘ती अगोदरच सुंदर होती; पण हा मेकअप तिला आणखी खुलवतो,’ तर काहींनी तिच्या टॅटूजवर प्रेम व्यक्त करत स्पॉन्सरची मागणीही केली. एक युजर म्हणाला, ‘ती खरंच एखाद्या मॉडेलसारखी दिसते!’ मीनने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला इतका प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही नव्हती. तिला तिचं काम आवडतं आणि ती अभिमानाने सांगते की, रस्ते स्वच्छ ठेवणं, ही तिच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news