न्यूयॉर्क : सर्वसामान्यांसाठी पौष्टिक फळ म्हणून केळी ओळखली जाते. महाराष्ट्रात केळीचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, केळीला कधी चांगला दर मिळतो कधी दर घसरलेला असतो. आता मात्र एका केळाच्या आर्टवर्कने कलाकारास मालामाल करून दिले आहे. त्याचे हे आर्टवर्क 52 कोटी रुपयांत विकले गेले आहे.
न्यूयॉर्कमध्ये सध्या या केळाची चर्चा होत आहे. हे केळ म्हणजे एक अनोखे आर्टवर्क आहे. भिंतीवर टेपने चिकटवलेले हे केळ आहे. हे डक्ट-टेप असणारे केळ मौरिजियो कॅटेलनचे आर्टवर्क ‘कॉमेडियन’ आहे. ही एक प्रसिद्ध कलाकृती आहे. न्यूयॉर्कमधील लिलावात या केळाची किंमत 5.2 मिलियन अमेरिकी डॉलर होती. शेवटी त्याची 6.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52.35 कोटींत या केळाची विक्री झाली. क्रिप्टो उद्यमी जस्टिन सन यांनी 2019 मध्ये व्हायरल कलाकृती तीन भागात घेतली. मौरिजियो कॅटेलन यांची भिंतीवर डक्ट-टेप असणारी कलाकृती याचा लिलाव झाला. या केळीच्या लिलावाची सुरुवात 1 ते 1.5 मिलियन अमेरिकी डॉलरपासून झाली. त्यानंतर अनेक विक्रम या लिलावात मोडले गेले. कॉमेडियन नावाच्या 2019 मधील कलाकृतीचे तीन संस्करण आहे. त्यातील एकाचा लिलाव झाला. 5.2 मिलियन यूएस डॉलरमध्ये हा लिलाव झाला. त्यानंतर लिलाव करणारा ओलिवर बार्कर म्हणाला, मी कधी विचार केला नव्हता एका केळासाठी 5 मिलियन डॉलर देणार आहे. केळीसाठी क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी शेवटची बोली लावली. ती 6.2 मिलियन अमेरिकी डॉलर होती. आता सन यांना केळ आणि डक्ट टेपचा एक रोल मिळणार आहे. 2019 मध्ये आर्ट बासेल मियामी फेअरमध्ये कॉमेडियन्सने तीन भाग काढले. त्याची 1 लाख 20 हजार डॉलर्स किंमत होती. त्यामुळे त्याच्या बातम्या जगभरात झाल्या. न्यूयॉर्कमधील एका प्रदर्शनादरम्यान कलाकार डेव्हिड डटुनाने या कलाकृतीतून केळी काढली आणि ती खाल्ली तेव्हा ते व्हायरल झाले.