Bahrain Underwater Theme Park | बहरीनने समुद्रात बनवले जगातील सर्वात मोठे ‘अंडरवॉटर थीम पार्क’

 Bahrain Underwater Theme Park |
Bahrain Underwater Theme Park | बहरीनने समुद्रात बनवले जगातील सर्वात मोठे ‘अंडरवॉटर थीम पार्क’
Published on
Updated on

मनामा (बहरीन) : भंगारात विक्रीसाठी आलेल्या एका जुन्या विमानाचा वापर करून बहरीन देशाने कमाईचा एक अनोखा आणि मोठा मार्ग शोधून काढला आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) अवघ्या ९५ लाख रुपयांना खरेदी केलेले एक निवृत्त ‘बोइंग ७४७’ विमान बहरीनने अरबी समुद्रात बुडवले आणि त्याभोवती जगातील पहिले अन् सर्वात मोठे ‘अंडरवॉटर थीम पार्क’ उभारले आहे.

हे अनोखे अंडरवॉटर पार्क तब्बल १ लाख चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. या पार्कमध्ये केवळ बुडवलेले विमानच नाही, तर पारंपरिक बहरीनी मोती व्यापाऱ्याचे घर आणि कृत्रिम प्रवाळ देखील तयार करण्यात आले आहेत. स्कुबा डायव्हर्ससाठी खास आकर्षण: आता समुद्रात खोलवर जाऊन डायव्हर्स या विमानाची पाहणी करू शकतात, मोती व्यापाऱ्याचे घर आणि कृत्रिम प्रवाळांचे सौंदर्य अनुभवू शकतात. थरारक अनुभव आणि पर्यावरण-पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण सध्या जगभरात मोठे आकर्षण ठरत आहे.

बहरीन सरकारचा मुख्य उद्देश देशाची अर्थव्यवस्था केवळ 'खनिजांच्या तेलावर' निर्भर न ठेवणे हा आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना आकर्षित करून 'इको-टूरिझम' आणि 'ॲडव्हेंचर स्पोर्टस्‌’ द्वारे जागतिक स्तरावर मोठा महसूल मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भंगारात निघणाऱ्या एका जुन्या विमानाचा असा कल्पक वापर करून बहरीनने पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news