Baby Born Weighing 6.4 kg | जन्मतःच ६.४ किलो वजनाचे बाळ

Baby Born Weighing 6.4 kg |
Baby Born Weighing 6.4 kg | जन्मतःच ६.४ किलो वजनाचे बाळ
Published on
Updated on

लंडन : एका नवजात बाळाचा जन्म सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. जन्माला येताच तब्बल ६.४ किलो वजन असलेल्या या बाळाने डॉक्टरांसह सर्वांनाच थक्क केले आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे जन्माला आलेले हे बाळ सामान्य नवजात बाळापेक्षा दुप्पट मोठे आहे. शरीराचा आकार खूप मोठा असल्यामुळे त्याच्यासाठी खरेदी केलेले नवजात बाळाचे सर्व कपडे लहान पडले आहेत. त्यामुळे जन्माच्या पहिल्याच दिवसापासून त्याला थेट ६ महिन्यांच्या बाळाचे कपडे घालावे लागत आहेत. कपड्यांसोबतच या बाळाचा आहारही सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. कारण, हे बाळ एकाच वेळी दोन बाटल्या दूध पित आहे.

ब्रिटनमधील मिल्टन कीन्स रुग्णालयात एका ३३ वर्षांच्या जेनेली रॉस नावाच्या महिलाने या बाळाला जन्म दिला आहे. ५ फूट ७ इंच उंच असलेल्या जेनेली यांची ही प्रेग्नन्सी अत्यंत त्रासाची होती. पोटात वाढणाऱ्या बाळाचा आकार इतक्या वेगाने वाढत होता की डॉक्टरांना दर १४ दिवसांनी त्यांची विशेष अल्ट्रासाऊंड आणि ब्लड शुगर टेस्ट करावी लागत होती. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असूनही डॉक्टरांना गर्भातील बाळाच्या वास्तविक वजनाचा अंदाज आला नव्हता आणि डिलिव्हरीच्या वेळीच बाळाचे खरे वजन समोर आले. जेनेली यांचे पती व्हिक्टर ओकनमे यांची उंची ६ फूट आहे. तज्ज्ञांच्या मते हे जेनेटिक्सचे एक दुर्मीळ प्रकरण आहे. जेनेली यांना आधीच दोन मुले आहेत; मात्र हे नवीन बाळ त्याच्या दोन्ही भावंडांच्या जन्माच्या वेळच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाचे आहे. वैद्यकीय इतिहासातील आकडेवारी पाहिल्यास हे बाळ थोड्या फरकाने ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात वजनी बाळ ठरण्यापासून राहून गेले. देशातील सर्वात वजनी बाळ असण्याचा रेकॉर्ड १९९२ मध्ये जन्माला आलेल्या गाय कार याच्या नावावर आहे, ज्याचे वजन ७ किलोग्रॅमपेक्षा जास्त होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news