

लंडन : फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्त्रेदेमस हा जगभरात त्याच्या कुटभाषेतील भाकितांसाठी प्रसिध्द आहे. सोळाव्या शतकातील या भविष्यवेत्त्याने ‘लेस प्रोफेटिस’ नावाचे पुस्तक लिहिले होते जे सन 1555 मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकात 942 काव्यमय रचना असून त्यामधून जगातील विविध घटनांची भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. बल्गेरियातही अशीच पुढील अनेक शतकांच्या काळातील जगभरातील घटनांची भविष्यवाणी करणारी व्यक्ती अलीकडच्या काळात होऊन गेली. 1996 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या या अंध महिलेचे नाव आहे बाबा वेंगा. तिला बाल्कन प्रदेशची ‘नॉस्त्रेदेमस’ म्हटले जाते. या महिलेने 2025 मध्ये जगात तिसरे महायुद्ध भडकणार, असे भाकित केल्याचे सांगितले जाते. आता ते खरे ठरण्याची चिन्हे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. (Baba Vanga prediction)
जगातील अनेक देशांमध्ये सध्या संघर्षाचे वातावरण बघायला मिळतंय. इस्रायल-हमास, रशिया-युक्रेन आणि आता सीरियामध्येही संघर्ष बघायला मिळतोय. अशातच बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार तिसरे महायुद्ध आता काही महिन्यांवर आले आहे. त्यांच्या अंदाजानुसार तिसरे महायुद्ध सीरियाच्या पतनाने सुरू होऊ शकते आणि सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण दिसते. जर खरोखरच परिस्थिती अशीच बदलत राहिली तर त्यांचा अंदाज खरा ठरू शकतो. डेली स्टार यूकेच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी 9/11चा दहशतवादी हल्ला आणि ब्रेक्झिटच्या परिणामांची अचूक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा बल्गेरियाचे रहिवासी होत्या. बालपणीच त्यांचे डोळे गेले. बाबा वेंगा यांनी दहशतवादी हल्ल्यांसह काही मोठे भाकीत केले होते. आता अशी भविष्यवाणी समोर आली आहे, जी जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच वाईट ठरणार आहे. तिसरे महायुद्ध झाले तर त्याच्या झळा प्रत्येक नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत. 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल, असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले. तिसरे महायुद्ध झाले तर असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागतील. जगातील अर्थव्यवस्थेसाठी देखील हा काळ कठीण ठरणार आहे. याशिवाय भूराजकीय परिस्थिती काय असेल हे सांगणेही कठीण ठरेल. डेली स्टार यूकेचे म्हणणे आहे की, सीरियन बंडखोर देशाच्या अनेक प्रमुख भागांवर वेगाने कब्जा करत आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांमध्ये म्हटल्याप्रमाणेच सीरियन देशातील सर्वात मोठे शहर काबीज केले आहे. बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या अनेकदा अनुमान आणि स्पष्टीकरणाचा विषय असतात. आता त्यांच्या तिसर्या महायुद्धाची भविष्यवाणी चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी 5079 पर्यंत भविष्य वर्तवल्याचे सांगितले जाते. (Baba Vanga prediction)