

बार्सिलोना : स्पेनमधील बार्सिलोना शहरात जगातील पहिल्या स्वयंचलित बसचा प्रायोगिक प्रवास सुरू झाला आहे. ही बस पूर्णपणे स्वयंचलित असून लेन बदलण्याआधी ब—ेक लावते. सध्या ही ड्रायव्हरलेस बस शहराच्या मध्यवर्ती भागात 2.2 किलोमीटर सर्क्युलर रुटवर चालत असून या बसला चार थांबे आहेत.
रेनॉल्ट कंपनीची ही इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज झाल्यानंतर 120 किलोमीटर्सपर्यंतचे अंतर कापू शकते. या बसचा कमाल वेग 40 किमी प्रतितास इतका आहे. या बसमध्ये 10 कॅमेरे आणि 8 लिडॉर सेंसर्स लावले गेले ही बस नंतर चारही थांब्यावर थांबते आणि प्रवाशांची चढउतार झाल्यानंतर आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करते. चीनमधील जेजियांग प्रांतात तसेच नेदरलँडमधील वैननिंगन प्रांतात देखील यापूर्वी रोबो शटल बसची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.
बार्सिलोना शहरातील ही नवी बस रेनॉल्ट समूह आणि वी राईड यांच्या संयुक्त माध्यमातून तयार करण्यात आली आहे. ती प्रथम मोबाईल वर्ल्ड काँग्रेसदरम्यान कॅटॅलोनियाच्या राजधानीत दिसली. या बसची प्रवासी क्षमता 8 इतकी आहे. बसचा मार्ग दोन किलोमीटर लांब असून त्यास 20 ते 30 मिनिटे लागतात. बसच्या आत तीन स्क्रीन आहेत: एक स्क्रीन मार्ग दाखवते, दुसरी स्क्रीन ट्रॅफिक एआयसह ट्रॅक करते आणि तिसरी स्क्रीन रस्त्यांना नोंदवते.