Japan mummy auction | जपानमध्ये ‘जलदानवा’च्या ममीचा लवकरच होणार लिलाव

Japan mummy auction |
Japan mummy auction | जपानमध्ये ‘जलदानवा’च्या ममीचा लवकरच होणार लिलाव
Published on
Updated on

टोकियो : ‘जलदानव’ (Water Monster) हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर एक भीतिदायक चित्र उभे राहते. पण, जपानमध्ये प्रत्यक्षात असाच एक अजब आणि भयानक जीव पाहायला मिळत आहे. जपानच्या फुकुशिमा शहरात एका जीवाचा अनेक वर्षे जुना सांगाडा सापडला आहे, ज्याचे रूप हुबेहूब एखाद्या जलदानवासारखा आहे. जलपरी, जलदानव अशा अर्धमानव-अर्धमत्स्य स्वरूपाच्या काल्पनिक कथा अनेक आहेत; पण असा सांगाडाही मिळू शकतो हे पाहून लोक थक्क झाले.

या सांगाड्याची आकृती इतकी विचित्र आहे की, ती पाहून कोणालाही धडकी भरेल. या जीवाचे दात मोठे असून त्याला मानवासारखे हात आहेत. विशेष म्हणजे, याच्या शरीराचा खालचा भाग एखाद्या जलपरीसारख्या शेपटीने जोडलेला आहे. या सांगाड्याचे स्वरूप जपानी लोककथांमधील प्रसिद्ध पौराणिक जलदानव ‘कप्पा’ सारखे दिसत आहे. जपानी लोककथांनुसार, ‘कप्पा’ हा तलावांमध्ये राहणारा एक भयानक जीव मानला जातो, जो लोकांना पाण्यात ओढून न्यायचा. असे मानले जाते की, याचा आकार एखाद्या लहान मुलासारखा असायचा. याच्या हातापायांची बोटे एकमेकांना जोडलेली असायची.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याच्या डोक्यावर एक पोकळ भाग असायचा ज्यात पाणी भरलेले असे. हे पाणीच त्याची खरी ताकद मानली जात असे. हा दुर्मीळ सांगाडा आता लिलावासाठी सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसांत ‘ओशू रेअर ट्रेझर मार्केट’ आणि योनेजावा शहरातील ‘सिटीझन्स गॅलरी’मध्ये याचा लिलाव केला जाईल. या सांगाड्याची बोली 11,755 पौंड (सुमारे 13 लाख रुपये) पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जगात केवळ 10 अशा ‘कप्पा’ सांगाड्यांची पुष्टी झाली आहे, त्यामुळे याला मोठी मागणी आहे. सोशल मीडियावर या सांगाड्याचे फोटो व्हायरल होत असून, लोक याची तुलना थेट जपानी लोककथांमधील पात्रांशी करत आहेत. हा लिलाव ऐतिहासिक ठरेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news