नवी दिल्ली :
अवकाशातील तार्यांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. किंबहुना या तार्यांनाच शास्त्रज्ञ चक्क 'ब्रह्मांडाची चावी' म्हणून ओळखतात. कारण या खगोलीय पिंडापासूनच ब्रह्मांडाबद्दलची जास्त माहिती मिळते. ब्रह्मांडातील दुसर्या पिंडांच्या निर्मितीत या तार्यांचा जरा तरी सहभाग असतोच. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनातून तार्यांच्या प्रक्रियांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. यातून तारे कसे आणि का मरतात? या खगोलीय प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी तार्यांची खास अवस्था सुपरनोव्हा (र्डीशिीर्पेींर) व त्यातील कणांचे (झरीींळलरश्र) सर्वात सूक्ष्म रूप असलेल्या न्यूट्रिनोचा (छर्शीीींळपे) अभ्यास करून तार्यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती मिळविण्यात यश प्राप्त केले. तार्यांमध्ये न्यूट्रिनोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तर सुपरनोव्हा ही तार्याची अंतिम अवस्था असते. काहीवेळा दुसर्या तार्याच्या निर्मितीदरम्यान ही अवस्था बदलत असते. यामध्ये न्यूट्रिनोही महत्त्वाचे असतात.
ज्यावेळी आकुंचन पावणार्या सुपरनोव्हाच्या केंद्रभागी शक्तिशाली स्फोट होतो, त्यावेळी त्यातून मोठ्या संख्येने न्यूट्रिनो बाहेर पडत असतात.ज्यावेळी या न्यूट्रिनोचे घनत्व जास्त असते, त्यावेळी ते आपले प्रारूप बदलत असतात.
संशोधकांनी 'सुपरनोव्हा'च्या सर्व तीन प्रारूपांचा अभ्यास केला. यामधून त्याने तारे कसे आणि का मरतात, याची माहिती मिळविली. यासाठी संशोधकांनी 'नॉन लिलियर सिम्युलेशन' तयार केले. हे सिम्युलेशन सुपरनोव्हाच्या तिन्ही प्रारूपांवेळी होणार्या बदलाचे होते. या बदलामध्ये छोटे छोटे कण न्यूट्रिनोमधील आंतरक्रियेचे रूप बदलतात. या न्यूट्रिनोंचेही तीन प्रारूप असतात यामध्ये म्यूओन, इलेक्ट्रोन व ताऊ न्यूट्रिनो यांचा समावेश असतो. केंद्रस्थानी स्फोट झाल्यानंतर तार्यांच्या अशा सूक्ष्म कणांत तुकडे होऊन त्यांचे अवकाशातील अस्तित्व नाहीसे होते म्हणजे ते मृत होतात. हे संशोधन 'सिम्युलेशन रिव्ह्यू लेटर्स' नामक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.