पृथ्वीला 2032 मध्ये लघुग्रहाच्या धडकेचा धोका!

पृथ्वीला 2032 मध्ये लघुग्रहाच्या धडकेचा धोका!
File Photo
Published on
Updated on

अबु धाबी : संयुक्त अरब अमिरातीमधील अबु धाबीच्या इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमी सेंटरने म्हटले आहे की, पृथ्वीच्या दिशेने एक मोठ्या आकाराचा लघुग्रह येत आहे. या लघुग्रहाला सेंटरने ‘2024 वायआर24’ असे नाव दिले आहे. 2032 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीच्या अतिशय जवळून जाईल व त्यापासून पृथ्वीला धडक होण्याचा धोकाही संभवू शकतो, असे सेंटरने म्हटले आहे. या लघुग्रहाचा आकार 1908 मध्ये सैबेरियात कोसळलेल्या मोठ्या उल्केइतका असू शकतो. या उल्केने सुमारे 2 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र उद्ध्वस्त केले होते.

या लघुग्रहाचा शोध गेल्या वर्षी 27 डिसेंबरला अ‍ॅटलस सिस्टीम टेलिस्कोपच्या साहाय्याने लावण्यात आला होता. ‘आयएसी’ चे संचालक आणि इंटरनॅशनल अ‍ॅस्टेरॉईड वॉर्निंग नेटवर्कचे सदस्य मोहम्मद शौकत ओदेह यांनी सांगितले की, या लघुग्रहाचा व्यास 40 मीटर ते 100 मीटरदरम्यान असू शकतो. हा लघुग्रह 40 मीटर व्यासाचा असणे म्हणजे त्याचा आकार एखाद्या क्रिकेट पिचपेक्षा दुप्पट असू शकतो. 100 मीटर व्यास असणे म्हणजे त्याचा आकार एका फुटबॉल पिचला व्यापणारा असू शकतो. या लघुग्रहाचा शोध लागल्यापासूनच त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याला ‘टोरिनो’ स्तरावर वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा लघुग्रहांची पृथ्वीला धडक होण्याची शक्यता 1.2 टक्क्यापर्यंत असते. आतापर्यंत ज्या लघुग्रहांची धडक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यापेक्षाही ही शक्यता अधिक आहे.

गेल्या वर्षी हा लघुग्रह 25 डिसेंबरला पृथ्वीपासून 8 लाख 29 हजार किलोमीटर अंतरावरून गेला होता. ओदेह यांनी सांगितले की, 17 डिसेंबर 2028 मध्येही तो पृथ्वीजवळून जाईल; पण त्यावेळी त्याच्यापासून कोणताही धोका असणार नाही. मात्र, 22 डिसेंबर 2032 मध्ये तिसर्‍यांदा हा ज्यावेळी पृथ्वीजवळून जाईल, त्यावेळी त्याच्यापासून पृथ्वीला धोका संभवू शकतो. त्याला आतापर्यंत केवळ 34 दिवसच पाहण्यात आले आहे. सध्या त्याची चमक फिकी झाल्याने, त्याचे निरीक्षण करणे कठीण बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news