Artificial island construction | समुद्राच्या अजस्त्र लाटांना न घाबरता बनवलेले कृत्रिम बेट

Artificial island construction |
Artificial island construction | समुद्राच्या अजस्त्र लाटांना न घाबरता बनवलेले कृत्रिम बेट
Published on
Updated on

अ‍ॅमस्टरडॅम : असं म्हणतात की निसर्गापुढं कोणाचीही मनमानी चालत नाही. पण, मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञानाच्या बळावर निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्या सिद्धांतांना नवं वळण देत अशी काही किमया विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे, की त्या सर्व कृती एखाद्या आश्चर्याहून कमी नाहीत. ज्या तंत्रज्ञानाच्या बळावर मानव चंद्रावर पोहोचला, त्याच तंत्रज्ञानाच्या बळावर समुद्राच्या अजस्त्र लाटांनासुद्धा नमवण्यात यश मिळाल्याचं एका अद्वितीय उदाहरणातून लक्षात येतं. नेदरलँडस्मध्ये अशाच जिद्दीतून एक नवे कृत्रिम बेट बनवण्यात आलेले आहे. या बेटाचं क्षेत्रफळ 970 चौरस किलोमीटर (साधारण 374.5 चौरस मैल) इतक्या भागावर वसलं आहे. या बेटावर 4,00,000 हूनही अधिक लोकसंख्येचा वावर आहे.

बेट म्हटलं की, चारही बाजूंना समुद्र आणि मधोमध असणारा भूभाग डोळ्यांसमोर येतं. पण, मानवनिर्मित बेटांचा उल्लेख होतो तेव्हा मात्र दुबईतील पाम जुमेराह किंवा चीनमधील काही प्रकल्पच लक्ष वेधतात. मात्र, जगातील सर्वात मोठं मानवनिर्मित बेट कुठंय तुम्हाला कल्पना आहे? हे बेट आहे युरोपातील नेदरलँडस् देशात, ज्याचं नाव आहे फ्लेवोपोलर. अतिप्रचंड अशा या भूखंडाच्या निर्मितीची सुरुवात 1919 मध्ये ‘जुइडरजी प्रोजेक्ट’ अंतर्गत करण्यात आली. यामध्ये डच इंजिनिअरच्या पथकांनी बंधारे आणि पंपांच्या मदतीनं समुद्रातील पाणी बाहेर काढत कोरडी जमीन तयार केली. हे बेच गूइमीर, केटेलमीर, वेलुवेमीर अशा गोड्या पाण्याच्या तलावांनी वेढलं आहे.

6 दशकांहून अधिक काळ या बेटाच्या निर्मिसाठी खर्ची घालण्यात आला. सर्वप्रथम 1932 मध्ये ‘अफस्लुइतडिज्क’ नावाचा 32 किमी लांब बंधारा इथं बांधण्यात आला, ज्यानं खार्‍या पाण्याचा प्रवाह थांबवला. यानंतर 1957 मध्ये पूर्व फ्लेवोपोलर आणि 1968 मध्ये दक्षिण फ्लेवोपोलर पाण्याबाहेर आले आणि त्यातूनच आज अस्तित्वात असणार्‍या फ्लेवोपोलरची निर्मिती झाली. 1 जानेवारी 1986ला फ्लेवोलँड हे ठिकाण नेदरलँडस्मधील 12 वे अधिकृत प्रांत ठरलं. जिथं, समुद्राचा तळ होता आणि शून्यातूनच ही जमीन राहण्यालायक बनवण्यात आली. लेलीस्टॅड आणि अल्मेरे अशी शहरे आजच्या घडीला इथं वसली असून, वाढल्या लोकसंख्येचा आधार ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news