आर्क्टिक महासागर एकेकाळी होता गोड्या पाण्याचा ‘तलाव’!

Published on
Updated on

लंडन : आर्क्टिक महासागर हा एकेकाळी गोड्या पाण्याचा तलावच होता असे संशोधकांनी म्हटले आहे. त्याच्यावर अमेरिकेतील ग्रँड कॅनियन या सर्वात मोठ्या दरीइतक्या उंचीचा बर्फाचा स्तर होता. हा समुद्र त्या काळात जगातील अन्य समुद्रांपासून वेगळा पडलेला होता. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी ही स्थिती निर्माण झालेली होती.

याबाबतच्या आश्‍चर्यकारक संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकात देण्यात आली आहे. ज्यावेळी बर्फाचा स्तर वितळतो त्यावेळी समुद्राची पातळी वाढत असते. मात्र, ज्यावेळी बर्फाचा स्तर वाढतो त्यावेळी समुद्राची पातळी खालावलेली असते. एकेकाळी आर्किटमध्येही असेच घडले होते. तिथे त्यावेळी अर्धा मैल जाडीचा बर्फाचा स्तर होता. त्यामुळे या समुद्राचा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराशी असलेला संबंध जवळजवळ तुटला होता. ग्रीनलँड, आइसलँड, सैबेरिया आणि उत्तर युरोपची स्थिती त्यावेळी आर्क्टिक असलेल्या एखाद्या वाडग्याच्या कड्याप्रमाणे होती. तिथे पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराचे खारे पाणी येऊ शकत नव्हते. 1,50,000 ते 1,30,000 वर्षांपूर्वी तसेच पुन्हा 70 हजार ते 60 हजार वर्षांपूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news