Doomsday Glacier | अंटार्क्टिकाचा ‘डूम्सडे ग्लेशियर’ धोक्यात

समुद्राची पातळी वाढल्याने कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात!
Doomsday Glacier |
Doomsday Glacier | अंटार्क्टिकाचा ‘डूम्सडे ग्लेशियर’ धोक्यात
Published on
Updated on

वॉशिंग्टन: अंटार्क्टिकातील अत्यंत संवेदनशील मानला जाणारा ‘थ्वाइटस् ग्लेशियर’, ज्याला ‘डूम्सडे ग्लेशियर’ (विनाशकारी हिमनदी) म्हणून ओळखले जाते, त्याबाबत शास्त्रज्ञांनी एक अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे. या हिमनदीचे संरक्षण करणारी बर्फाची कडा लवकरच तुटण्याच्या मार्गावर आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून जागतिक पातळीवर कोट्यवधी लोकांना याचा गंभीर फटका बसू शकतो.

ही हिमनदी आधीच वेगाने वितळत आहे. जर हा संपूर्ण ग्लेशियर कोसळला, तर जागतिक समुद्राची पातळी सुमारे 26 इंच (65 सेंटीमीटर) वाढू शकते. यामुळे जगातील अनेक किनारी भागांतील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ—ान्सिस्को आणि मियामी यांसारख्या मोठ्या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा धोका आधीच जाणवू लागला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, फ्लोरिडा राज्याच्या आकाराचा हा संपूर्ण ग्लेशियर लगेच कोसळणार नाही. परंतु, थ्वाइटस्ची पूर्व बाजूची बर्फाची कडा आता मुख्य हिमनदीपासून वेगळी होत आहे. ही बर्फाची कडा एका तरंगत्या आधारस्तंभासारखे काम करत होती, ज्यामुळे अंटार्क्टिका खंडावर स्थिर असलेल्या या हिमनदीचा बर्फ समुद्रात वाहून जाण्याचा वेग कमी राहत होता.

‘या बर्फाच्या कड्याचे विघटन याच वर्षात कधीही होऊ शकते,’ अशी माहिती बि—टिश अंटार्क्टिक सर्व्हेमधील सागरी भूभौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट लार्टर यांनी दिली आहे. शास्त्रज्ञांनी तर आतापासूनच या बर्फाच्या कड्याच्या ‘अंताची’ घोषणा केली आहे. या बर्फाच्या कड्याचा नाश झाल्याने हिमनदीवर आणि किनारी भागांवर नेमका काय परिणाम होईल, याचा अभ्यास ‘इंटरनॅशनल थ्वाइटस् ग्लेशियर कोलॅबोरेशन’ कडून केला जात आहे. अमेरिका आणि बि—टनच्या संशोधन संस्था संयुक्तपणे या वेगाने बदलणार्‍या आणि गुंतागुंतीच्या पर्यावरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news