अंटार्क्टिकाचे पाणी अधिक खारट होतेय, बर्फही वितळतोय!

antarctic-water-becoming-saltier-ice-melting-rapidly
अंटार्क्टिकाचे पाणी अधिक खारट होतेय, बर्फही वितळतोय!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या दक्षिण टोकावर एक मोठे पर्यावरणीय संकट आकार घेत आहे. अंटार्क्टिका खंडाभोवतीचे पाणी अनपेक्षितपणे अधिक खारट होत असून, त्यामुळे तेथील सागरी बर्फ वेगाने वितळत असल्याचे एका नव्या अभ्यासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे नेमके का घडत आहे, याबद्दल शास्त्रज्ञ अद्याप अनभिज्ञ आहेत.

2015 पासून अंटार्क्टिकावरील सागरी बर्फात सातत्याने घट होत आहे. 2023 मध्ये तर या बर्फाने सर्व विक्रम मोडले आणि अपेक्षित सरासरीपेक्षा तब्बल 15.5 लाख चौरस किलोमीटरने कमी बर्फाची नोंद झाली. त्या वर्षी जुलै महिन्यातील हिवाळ्याच्या उच्चांकावेळी पश्चिम युरोप खंडापेक्षाही मोठा बर्फाचा तुकडा या प्रदेशातून गायब झाला होता आणि ही परिस्थिती पुन्हा सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अलीकडच्या दशकांमध्ये पृथ्वीवर कुठेही न पाहिलेला हा सर्वात मोठा पर्यावरणीय बदल मानला जात असून, त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाच्या हवामानावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘पीएनएएस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी बर्फाच्या या घटीचा संबंध समुद्राच्या वाढत्या खारटपणाशी जोडला आहे. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि साऊथेम्प्टन विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अलेस्सांद्रो सिल्वानो यांनी सांगितले, ‘आम्हाला या निष्कर्षांचे आश्चर्य वाटले. हे अपेक्षित निष्कर्षांच्या अगदी उलट आहे. कारण, सामान्यतः बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाण्यात गोडवा येतो, खारटपणा नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘हे दक्षिण महासागरात केवळ सागरी बर्फातच नव्हे, तर त्याखालील समुद्राच्या रचनेतही खोलवर बदल होत असल्याचे सूचित करते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news