Antarctica penguin: अंटार्क्टिकाच्या ‌‘त्या‌’ पेंग्विनचा एकांतवास की बंडखोरी?

अंटार्क्टिकाच्या असीम बर्फाळ प्रदेशात, आपल्या थव्यापासून लांब डोंगरांच्या दिशेने एकटाच चालत जाणारा एक पेंग्विन सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे
Antarctica penguin: अंटार्क्टिकाच्या ‌‘त्या‌’ पेंग्विनचा एकांतवास की बंडखोरी?
Published on
Updated on

नवी दिल्ली : अंटार्क्टिकाच्या असीम बर्फाळ प्रदेशात, आपल्या थव्यापासून लांब डोंगरांच्या दिशेने एकटाच चालत जाणारा एक पेंग्विन सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, हा पेंग्विन आता केवळ एक पक्षी नसून ‌‘बंडखोरी‌’ आणि ‌‘एकांताचे‌’ प्रतीक बनला आहे.

हा व्हिडीओ जरी आता व्हायरल झाला असला, तरी तो नवा नाही. ही क्लिप 19 वर्षांपूर्वीची, म्हणजे 2007 मधील ‌‘एनकाऊंटर्स एट द एंड ऑफ द वर्ल्ड‌’ या डॉक्युमेंटरीमधील आहे. याचे दिग्दर्शन प्रसिद्ध जर्मन चित्रपट निर्माते वर्नर हर्जोग यांनी केले होते. पेंग्विन सहसा समुद्राच्या दिशेने जातात, जिथे त्यांना अन्न आणि जीवन मिळते. मात्र, हा एडली पेंग्विन उलट दिशेने, म्हणजे दुर्गम डोंगररांगांकडे चालू लागला. हर्जोग यांनी या प्रवासाला ‌‘डेथ मार्च‌’ (मृत्यूची यात्रा) असे नाव दिले. कारण, त्या दिशेला पेंग्विनचे जिवंत राहणे अशक्य होते. चित्रपटात तज्ज्ञ डॉ. डेव्हिड एनली यांनी सांगितले की, जर त्या पेंग्विनला पकडून पुन्हा त्याच्या थव्यात आणून सोडले असते, तरीही तो पुन्हा वळून त्याच ‌‘डेथ मार्च‌’वर निघाला असता.

निर्मात्यांच्या माहितीनुसार, तो पेंग्विन डोंगरांच्या दिशेने सुमारे 70 कि.मी. चालत गेला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. या पेंग्विनचा व्हिडीओ आता जगभरात विविध संदर्भाने शेअर केला जात आहे : डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या पेंग्विनचा एक एआय जनरेटेड फोटो शेअर करून ग््राीनलँडवरील दाव्याबाबत भाष्य केले. कामाचा ताण : अनेक नोकरदार वर्ग 9 ते 5 ची नोकरी आणि कॉर्पोरेट कल्चरला कंटाळून ‌‘मलाही या पेंग्विनसारखे दूर निघून जायचे आहे,‌’ अशा आशयाचे मीम्स शेअर करत आहेत. आंतरिक शांती : काहींसाठी हा पेंग्विन जगाचा दिखावा आणि गर्दी सोडून स्वतःच्या शांतीच्या शोधात निघालेला ‌‘साधू‌’ वाटत आहे.

आज हा छोटासा पक्षी त्या लोकांसाठी प्रेरणा ठरला आहे, ज्यांना गोंगाट आणि दूषित वातावरणापासून दूर जायचे आहे. सोशल मीडियावर ‌‘इश ढहश झशपर्सीळप‌’ (त्या पेंग्विनसारखे बना) असे लिहून लोक स्वतःचे विचार मांडत आहेत. जगाच्या गर्दीपेक्षा स्वतःची वेगळी वाट निवडण्याचा मोठा धडा हा पक्षी देऊन गेला आहे, अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news