जीवाश्माच्या पोटात सापडले दुसरे जीवाश्म

Published on
Updated on

नवी दिल्ली : हजारो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनासोरसह अनेक प्राण्यांबद्दलची माहिती आपल्याला त्यांच्या जीवाश्मांच्या माध्यमातून  मिळत असते. दक्षिण-पश्चिम चीनमधील एका खाणीत खोदाई करताना शास्त्रज्ञांना एका अत्यंत धोकादायक शिकारी जीवाचे जीवाश्म मिळाले आहे. उल्लेखनीय म्हणजे या जीवाश्माच्या पोटात तब्बल चार मीटर लांबीच्या सरपटणार्‍या प्राण्याचे जीवाश्म होते.

खाणीत सापडलेल्या या जीवाश्माला 'इचियोसॉर' असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याच्याच पोटात आणखी एक जीवाश्म आढळून आले आहे. पोटातील जीवाश्म हे लांब पालीसारख्या सागरी प्राण्याचे आहे. त्याला 'थालाटोसॉर' असे नाव देण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, इचियोसॉरने थालाटोसॉरची शिकार करून अथवा त्याला मेल्यानंतर अख्खे गिळले असणार. मात्र, यासंबंधी आणखी संशोधन होणे बाकी आहे.

'कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी'तील जीवाश्म जीवविज्ञान विभागाचे प्रोफेसर व या संशोधनाचे सहलेखक रियोसूके मोटानी यांच्या मते, आतापर्यंत सापडलेल्या सरपटणार्‍या प्राण्यांच्या जीवाश्माच्या पोटात दुसरे जीवाश्म सापडले नव्हते. मात्र, एखाद्या जीवाश्माच्या पोटात दुसरे जीवाश्म आढळणे, हा एक अद्भुत अनुभव आहे. मात्र, इचियोसॉरच्या पोटात आढळलेल्या जीवाश्मावर पोटातील अ‍ॅसिडचा कोणताच परिणाम झाला नव्हता. याचा अर्थ असा होतो की इचियोसॉरने आपल्या भक्ष्याला जिवंत गिळले होते. मात्र, यासंदर्भात आणखी संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news