Chilean Mummies | चिलीतील ममींमध्ये आढळले देवी रोगाच्या विषाणूंचे जुने डीएनए

युरोपीय वसाहतवाद्यांनीच आजार पसरवल्याचा मिळाला थेट पुरावा!
Chilean Mummies |
Chilean Mummies | चिलीतील ममींमध्ये आढळले देवी रोगाच्या विषाणूंचे जुने डीएनए
Published on
Updated on

सँटियागो (चिली): युरोपीय वसाहतवाद्यांनी अमेरिकेत पाऊल ठेवल्यानंतर तिथे पसरलेल्या जीवघेण्या देवीच्या रोगाने (स्‍मॉलपॉक्‍स ) स्थानिक मूळ रहिवाशांचा मोठ्या प्रमाणावर बळी घेतला होता, या ऐतिहासिक सिद्धांताला आता थेट आण्विक (मॉलिक्युलर) आणि वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे. चिलीमध्ये सापडलेल्या ५०० वर्षे जुन्या ममींमध्ये देवीच्या रोगाच्‍या विषाणूचे प्राचीन डीएनए आढळून आले आहेत.'सायन्स' या नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ चिली आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी उत्तर चिलीमधील 'कामारोनेस ९' या ऐतिहासिक पुरातत्व स्थळावरील दोन ममींचा अभ्यास केला.

ममींमधून मिळालेले आर्थोपॉक्सव्हायरस व्हेरिओलाचे जीन्स युरोपमध्ये त्या काळात पसरलेल्या विषाणूंच्या प्रजातींशी तंतोतंत जुळणारे आहेत. हा उद्रेक १४९२ ते १६३१ दरम्यान झाला असावा. याच काळात स्पॅनिश आक्रमकांनी इनका साम्राज्यावर ताबा मिळवून राजाची हत्या केली होती. अमेरिकेतील मूळ रहिवाशांमध्ये ( प्राचीन अमेरिकन संस्कृतींतील रहिवाशी इंका, अझ्टेक, माया) या अनोख्या विषाणूंविरुद्ध कोणतीही नैसर्गिक प्रतिकारशक्ती नव्हती. यामुळे सुमारे ९५ टक्‍के स्थानिक लोकसंख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाली.संशोधकांच्या मते, सुरुवातीला हे वैज्ञानिक मानवी जनुकांचा शोध घेत होते, परंतु मानवी डीएनए नष्ट झाला होता आणि त्याऐवजी अतिशय उत्तम स्थितीत जतन झालेला देवीच्या विषाणूचा डीएनए सापडला. या ऐतिहासिक शोधाने युरोपीय वसाहतवादाच्या विनाशकारी परिणामांवर विज्ञानाची शिक्कामोर्तब केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news