क्वालालंपूर : 'उल्कावर्षाव' हा एक पृथ्वीवासीयांसाठी कुतूहलाचा विषय असतो. या घटनेचा लोक आपल्या नशीबाशीही संबंध जोडतात. आकाशातून कोसळणार्या या उल्का असतात. या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यताच नसते. काही उल्का म्हणजे धूमकेतू असतात; पण त्या उल्केसारख्या दिसतात. यासंदर्भात करण्यात आलेल्या एक नव्या संशोधनातील दाव्यानुसार संशोधक आता चार हजार वर्षांपूर्वीच्या धूमकेतूपासून निर्माण झालेल्या उल्केचाही शोध लावू शकणार आहेत.
धूमकेतू हे असे खगोलीय पिंड असतात की ते गॅस, धूळ, आणि खडक अथवा बर्फाने तयार झालेले असतात. ते सूर्याभोती फिरत असतात. अशा धूमकेतूंना सूर्याभोवतीचा एक फेरा पूर्ण करण्यास कधी तीन वर्षे तर कधी 70 हजार वर्षे लागतात. या संदर्भातील नवे संशोधन 'सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट'ने (सेटी) केली आहे. या संशोधकांच्या मते, आता आपण चार हजार वर्षांपूर्वी धूमकेतूपासून निर्माण झालेल्या उल्केचाही शोध लावू शकतो.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' आणि 'सेटी'च्या वतीने हे संयुक्त संशोधन करण्यात येत आहे. मात्र, हे यश 'कॅमराज फॉर ऑलस्काई मिटीयॉर सर्व्हिलान्स'शी संबंधित नव्या नेटवर्कमुळे मिळाले आहे. 'इराकस' नामक जर्नलमध्ये मीटियॉर शॉवर सर्व्हेच्या मते, ऑस्ट्रेलिया, चिली आणि नामिबिया येथे हे नेटवर्क स्थापन करण्यात आले आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञ हे रात्रीच्या वेळी होणारे उल्कावर्षाव अचूकपणे कॅमेराबद्ध करू शकतात. या नव्या नेटवर्क अथवा क्षमतेमुळे प्रत्येक चार हजार वर्षांनी पृथ्वीजवळून जाणारे धूमकेतू आणि त्यांनी जाताना सोडलेले अवशेषांची आपण आता ओळख धरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. पृथ्वीजवळून जाणार्या खगोलीय पिंडांच्या संशोधनासाठी हे नेटवर्क अत्यंत उपयोगी असल्याचे संशोधकांचे मत आहे.