Ancient Australian Crocodile Hunting | प्राचीन ऑस्ट्रेलियन मगरी बिबट्याप्रमाणे शिकार करत

अंड्यांच्या कवचातून उलगडले 5.5 कोटी वर्षांपूर्वीचे रहस्य
Ancient Australian Crocodile Hunting | प्राचीन ऑस्ट्रेलियन मगरी बिबट्याप्रमाणे शिकार करत
Published on
Updated on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतातील एका घराच्या परिसरात वैज्ञानिकांनी केलेल्या महत्त्वपूर्ण शोधामुळे प्राचीन मगरींच्या जीवनशैलीबद्दलचे जुने मत बदलले आहे. संशोधकांना 5.5 कोटी वर्षांपूर्वीच्या मगरींच्या जीवाश्म स्वरूपातील अंड्यांचे कवच सापडले आहेत. या कवचांच्या अभ्यासातून मेकोसुकाईन्स नावाच्या नामशेष मगरींच्या गटाबद्दल धक्कादायक माहिती मिळाली आहे. सिडनीचे पॅलेओन्टोलॉजिस्ट मायकल आर्चर यांच्या मते, या प्राचीन मगरी आधुनिक मगरींप्रमाणे फक्त पाण्यात राहत नव्हत्या. त्या झाडांवर चढून आणि बिबट्याप्रमाणे सावजावर उडी मारून शिकार करत असाव्यात.

या विचित्र शिकारीच्या तंत्रामुळे मेकोसुकाईन्स ही जमिनीवर राहणारी शिकारी होती, जी विविध वातावरणाशी जुळवून घेत असे. मगॉन येथे सापडलेले हे कवच ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने मगरींचे कवच आहे. त्याच्या सूक्ष्म तपासणीतून मेकोसुकाईन्सच्या प्रजनन प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण तपशील समोर आले आहेत. या मगरी तलावांच्या काठावर अंडी घालत असत. या काळात ऑस्ट्रेलियन परिसंस्थेत बदल होत होते, जिथे तलावातील पाणी ऋतूनुसार कमी होत असे किंवा तलाव कोरडे पडत असत. अशा बदलत्या परिस्थितीमुळे माशांची संख्या आणि शिकारीची उपलब्धता प्रभावित होत असे. त्यानुसार या मगरी घरटी बनवण्याच्या पद्धतीत बदल करत होत्या. ज्या ठिकाणी ही अंडी सापडली, तो मगॉन परिसर 5.5 कोटी वर्षांपूर्वी दाट जंगलांनी व्यापलेला होता. या परिसंस्थेत बेडूक, साप आणि जगातील सर्वात जुने ज्ञात गाणारे पक्षी यांचे वैविध्य होते. हा शोध मेकोसुकाईन्सची अनुकूलता आणि प्राचीन ऑस्ट्रेलियाची जैवविविधता दर्शवणाराही ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news