Israel bathing time app | इस्रायलमध्ये आंघोळीच्या वेळेसाठीही बनले अ‍ॅप!

Israel bathing time app |
Israel bathing time app | इस्रायलमध्ये आंघोळीच्या वेळेसाठीही बनले अ‍ॅप!
Published on
Updated on

तेल अवीव : सतत तणाव आणि हल्ल्यांच्या छायेत जगणार्‍या देशात रोजचं साधं आयुष्यही कठीण होतं. इस्रायलमधील नागरिकांची काहीशी अशीच परिस्थिती झाली आहे. इस्रायलचे लोक आंघोळीसारख्या साध्या कामासाठीही मोबाईल अ‍ॅपचा आधार घेत आहेत. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. आंघोळीसारख्या मूलभूत गरजेसाठीही अ‍ॅप वापरावा लागेल, असा विचार कदाचित कोणी केला नसेल; मात्र इस्रायलमध्ये हे प्रत्यक्षात घडत आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आकाशातून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका कायम असतो. त्यामुळे आंघोळीसारखं साधं कामही कधी कधी धोकादायक ठरू शकतं. यावर उपाय म्हणून इस्रायलमध्ये ‘ उरप ख डहेुशी’ (मी आता आंघोळ करू शकतो का?) नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलं आहे. हे प्लॅटफॉर्म नागरिकांना कोणता वेळ तुलनेने सुरक्षित आहे, याची माहिती देतं, जेणेकरून ते आंघोळीसारखं साधं कामही कमी धोका पत्करून करू शकतील.

युद्धाच्या या काळात अनेक प्रकारच्या वेबसाईटस् आणि डिजिटल साधनं समोर आली आहेत. मात्र ‘उरप ख डहेुशी’ या वेबसाईटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. इराणकडून होणार्‍या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे ही वेबसाईट लोकांना सुरक्षित वेळ कोणती आहे हे सांगते. यामुळे लोकांना निर्धास्तपणे आंघोळ करता येते आणि अंगावर साबण लावलेला असतानाच अचानक बॉम्बपासून वाचण्यासाठी धाव घ्यावी लागेल, अशी परिस्थिती टाळण्यास मदत होते. ‘उरप ख डहेुशी’ ही वेबसाईट रॉकेट हल्ल्यांचे पॅटर्न आणि संभाव्य अलर्ट यांचे विश्लेषण करून आंघोळ करण्यासाठी किती सुरक्षित वेळ आहे, याचा रिअल-टाईम अंदाज देते.

यासाठी ती आधीच्या हल्ल्यांचा ऐतिहासिक डेटा आणि सध्याच्या इराणी हल्ल्यांची परिस्थिती एकत्र करून धोका किती आहे, याचे मूल्यांकन करते. मग प्रश्न पडतो की सुरक्षित वेळ नेमकी कोणती? उपलब्ध सध्याच्या आकडेवारीनुसार ही वेबसाईट पहाटे 5 वाजून 30 मिनिटांची वेळ आंघोळीसाठी तुलनेने सर्वात सुरक्षित असल्याचे सांगते. कारण, त्या वेळेत हल्ल्यांची शक्यता सर्वात कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळेच इस्रायलचे नागरिक आंघोळीपूर्वी वारंवार या अ‍ॅपकडे पाहत असतात. या उपक्रमाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने ‘द’ वर लिहिले, “ऐकायला हे थोडं मजेशीर वाटू शकतं; पण प्रत्यक्षात ते खूप उपयोगी आहे. टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर धावणं खूप अवघड असतं आणि बाथरूममध्ये पाणी सुरू असताना सायरनचाही आवाज नीट ऐकू येत नाही.” तर आणखी एका यूजरने स्वतःचा अनुभव सांगताना लिहिले, “माझ्यासोबत असं आधी घडलं आहे. अंगावर साबण लावलेला असताना शेल्टरकडे धाव घेणं अजिबात सुखद अनुभव नसतो.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news