सुनीतासाठी अमेरिका रशियाकडे मागणार मदत?

सुनीता विल्यम्ससाठी अमेरिका रशियाकडे मदत मागेल का?
America Russia's request for help for Sunita?
सुनीता विल्यम्सPudhari File Photo

वॉशिंग्टन : अमेरिका आणि रशियादरम्यान किती तणाव आहे हे जग जाणते. मात्र, अशा स्थितीतही गेल्यावर्षी सोयूज यान पाठवून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांना पृथ्वीवर आणले होते. सध्या भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचा सहकारी बुच विल्मोर हे ‘आयएसएस’वर अडकून पडले आहेत. आता त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठीही रशिया मदत करू शकतो. मात्र, त्यासाठी अमेरिका रशियाकडे मदत मागेल का, हा प्रश्न आहे.

अंतराळवीरांचे 2 जुलैपर्यंत पुनरागमन होणे अपेक्षित

सुनीता आणि विल्मोर बोईंग स्टारलायनरमधून ‘आयएसएस’ला रवाना झाले होते. यानाच्या लाँचिंगवेळीही अनेक वेळा समस्या आल्या होत्या. आताही हे यान ‘आयएसएस’वर पोहोचल्यावर त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. अशा स्थितीत सुनीता व विल्मोर यांचे येणे लांबतच चालले आहे. एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी त्यांच्या परतीसाठी मदत करील, असे म्हटले जाते; परंतु ‘स्पेस एक्स’ची मदत घ्यावी की नाही, यावर ‘नासा’ला निर्णय घ्यावा लागेल. एक पर्याय रशियाचादेखील आहे. जर रशियाशी बोलणी झाली, तर त्यांच्या सोयूज स्पेसक्राफ्टमधून दोन्ही अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर येऊ शकतात. गेल्यावर्षीदेखील रशियाने अशी कामगिरी केली होती. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरने 5 जूनला आयएसएसकडे झेप घेतली होती. दोन्ही बोईंगच्या स्टारलाईनरमध्ये बसून पोहचले होते. हा एक रियूजेबल स्पेसक्राफ्ट आहे, जो अंतराळात जाण्यासाठी आणि तिथून पुन्हा येण्यासाठी डिजाईन करण्यात आला आहे. मिशन 9 दिवसांचे होते; परंतु स्पेस क्राफ्टमधून हेलियम गॅस लीक होत असल्यामुळे स्टारलाईनरमध्ये बिघाड आला आहे. ‘नासा’ने म्हटले होते की, अंतराळवीर 26 जूनला परत येतील; परंतु असे होऊ शकले नाही. आता 2 जुलैपर्यंत पुनरागमन होणे अपेक्षित आहे. स्पेस एक्सला हे काम दिले तर ते दोन्ही अंतराळवीर पुन्हा येऊ शकतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोईंग आणि स्पेस एक्स एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. स्पेस एक्स दोन्ही अंतराळवीरांना परत घेऊन येऊ शकते; परंतु असे झाल्यास बोईंगच्या स्टारलाइनर प्रोजेक्टचे हे अपयश म्हटले जाईल. बोईंगने हे स्पेस क्राफ्ट निर्माण करण्यावर खूप वेळ आणि पैसे खर्च केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news