

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या एका हौशी खगोलशास्त्रज्ञाने एक तेजस्वी हिरव्या रंगाचा धूमकेतू शोधून काढला आहे, जो आताच्या काळात सौरमालेच्या अंतर्गत भागाकडे झेपावत आहे. ‘स्वॅन 25 एफ’ असे नाव असलेल्या या धूमकेतूने खगोलशास्त्रात चांगलीच उत्सुकता निर्माण केली असून, येत्या काही आठवड्यांत तो नुसत्या डोळ्यांनीही दिसण्याची शक्यता आहे. सध्या, ज्यांच्याकडे चांगले दुर्बिणी उपकरण आहे, ते तो बघू शकतात.
हा धूमकेतू 1 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियन हौशी खगोलशास्त्रज्ञ मायकेल मॅटियाज्झो यांनी शोधला. त्यांनी युरोपियन स्पेस एजन्सीच्या डजकज अंतराळ यानावरील ‘स्वॅन’ कॅमेर्याने टिपलेल्या प्रतिमांमधून या धूमकेतूचे अस्तित्व ओळखले, असे डरिलशुशरींहशी. लेा या संकेतस्थळाने वृत्त दिले. त्यानंतर अनेक व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांनी ‘स्वॅन 25 एफ’ चे अस्तित्व पडताळले असले, तरीही नासाच्या ‘मायनर प्लॅनेटस् सेंटर’ने या धूमकेतूची अधिकृत नोंद अद्याप केली नाही. त्यामुळे या वस्तूच्या अचूक आकार, वेग, कक्षा व मूळाविषयीची माहिती अपुरीच आहे. मात्र, प्रारंभिक गणनांनुसार हा धूमकेतू 1 मे रोजी आपल्या कक्षेत सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूवर म्हणजेच ’ perihelion' पोहोचेल आणि तो सूर्यापासून सुमारे 5 कोटी किलोमीटर (31 दशलक्ष मैल) अंतरावर असेल.
या धूमकेतूचा सर्वोत्कृष्ट फोटो ऑस्ट्रियातील मायकेल जेगर आणि जेराल्ड रेहमान या खगोल छायाचित्रकारांनी टिपला. जेगर यांच्या म्हणण्यानुसार, या फोटोत ‘स्वॅन 25 एफ’ ची शेपटी आकाशात 2 अंशांपर्यंत पसरणारी आहे. या धूमकेतूचा पाचूसारखा हिरवा प्रकाश संभवतः डायकर्बन या संयुगामुळे आहे.