अमेरिकेतील नेवाडामध्ये परग्रहवासी | पुढारी

वॉशिंग्टन : अमेरिकेतील नेवाडा प्रांतात लास वेगासपासून 130 किलोमीटरवर 'एरिया-51' नावाचा वाळवंटी भाग आहे. हा भाग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याठिकाणी अठरा विमानांचे विशाल हँगर रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा भाग एलियन म्हणजेच परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत चर्चेत आहे.

अमेरिकेतील पायलट गॅब्रिएल झिफमॅन याने या ठिकाणाची काही जुनी-नवी छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामध्ये हा भाग आता रिकामा झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वीच तिथे विमानांचे जायंट हँगर होते. 'एरिया-51' हा अमेरिकेतील भाग अत्यंत गोपनीय व रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानला जातो. याठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या प्रवेशास मज्जाव आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की याठिकाणी एलियन्सबाबत संशोधन केले जाते. विशेष म्हणजे अमेरिकन सरकार नेहमीच या ठिकाणाचे अस्तित्वच फेटाळत आले आहे. कालांतराने सरकारने त्याचे अस्तित्व स्वीकारले. याच ठिकाणी 1947 मध्ये एक 'यूफो' म्हणजेच परग्रहवासीयांचे यान (उडती तबकडी) कोसळल्याचे म्हटले जाते. या यानाचे अवशेषही याठिकाणी असल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news