शैवाळ-संपृक्त बुरशी ‘लायकेन’ मंगळावर टिकू शकते : नवे संशोधन

शैवाळ-संपृक्त बुरशी ‘लायकेन’ मंगळावर टिकू शकते : नवे संशोधन
File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मंगळावरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पृथ्वीवरील लायकेन या जीवसृष्टीचे घटक जगू शकतात, असे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांनी एका प्रयोगात लायकेनवर मंगळावरील संपूर्ण वर्षभराच्या किरणोत्सर्गाचा मारा अवघ्या एका दिवसात केला आणि हे पृथ्वीजन्य जीव या कठीण परीक्षेतही टिकून राहिले!

मंगळावर जीवन टिकणे सहज शक्य नाही. हा लाल रंगाचा ग्रह एक विस्तीर्ण वाळवंट आहे, जिथे वातावरण अत्यल्प आहे, तापमान खूपच कमी असते आणि पृष्ठभागावर द्रव स्वरूपात पाणीही नाही. मात्र, मंगळावरील जीवनासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे मजबूत चुंबकीय क्षेत्राचा अभाव. यामुळे तेथील जीवसृष्टीला अंतराळातील किरणोत्सर्ग थेट मारक ठरतो, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते आणि ‘डीएनए’मध्ये बदल होऊ शकतो. मात्र, लायकेन हे जीवसंघ, ज्यात बुरशी व प्रकाश संश्लेषण करणारी शैवाळ किंवा जीवाणू एकत्र राहतात, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतात. हे लायकेन खरे जीव नाहीत, पण जीवनवृक्षावर स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंदले गेले आहेत. यामधील अनेक प्रजाती 'extremophiles' म्हणजेच अतिवैचित्र्यपूर्ण वातावरणात जगू शकणारे जीव आहेत. काही लायकेन तर थेट अवकाशातील निर्वात अवस्थेतही जिवंत राहिल्याचे नोंदले गेले आहे.

31 मार्च रोजी IMA Fungus या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी दोन लायकेन प्रजातींवर Diploschistes muscorum and Cetraria aculeata, मंगळासारख्या परिस्थितीत आणि किरणोत्सर्गाखाली कसे वागतात, याचा अभ्यास केला. हे परीक्षण पोलंडच्या वारसॉ येथील पोलिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या स्पेस रिसर्च सेंटरमध्ये एका विशेष निर्वात कक्षात करण्यात आले, जिथे मंगळावरील दाब, तापमान आणि वातावरणाची रचना कृत्रिमरीत्या तयार करण्यात आली होती. या कक्षात या लायकेनना 5 तासांत मंगळावरील एका वर्षभराच्या प्रमाणात किरणोत्सर्ग दिला गेला. परीक्षणाच्या अखेरीस दोन्ही प्रजातींच्या पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरू होण्यास सक्षम असल्याचे आढळले. जागेलोनियन विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या संशोधिका काया स्कुबावा म्हणाल्या, ‘या अभ्यासातून मंगळाच्या कृत्रिम वातावरणात जैविक प्रक्रिया कशा घडतात याची अधिक सखोल माहिती मिळाली आहे. तसेच, लायकेनसारख्या ओलसर जीवांचे किरणोत्सर्गावर कसे प्रतिसाद असतात, हेही स्पष्ट झाले.’ या दोन लायकेन प्रजातींपैकी D. muscorum ही प्रजाती सर्वाधिक टिकाऊ असल्याचे दिसून आले. तिच्या पेशींमध्ये होणारे नुकसान तुलनात्मकद़ृष्ट्या कमी होते. यावरून असे सुचते की, काही लायकेन प्रजाती मंगळावर टिकून राहण्यासाठी इतरांपेक्षा अधिक सक्षम असू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news