Albert Einstein | अल्बर्ट आईनस्टाईन यांना इस्रायलचे राष्ट्रपतिपद देण्याचा प्रस्ताव होता

Albert Einstein
Albert Einstein | अल्बर्ट आईनस्टाईन यांना इस्रायलचे राष्ट्रपतिपद देण्याचा प्रस्ताव होता
Published on
Updated on

तेल अविव : 1952 मध्ये इस्रायलचे पहिले राष्ट्रपती चौम वायझमन यांचे निधन झाल्यानंतर देशात त्यांच्या उत्तराधिकार्‍याबाबत चर्चा सुरू झाली. त्या काळात इस्रायलच्या वृत्तपत्रांनी जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचे नाव पुढे केले. तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांनीही जगातील सर्वात थोर यहुदी म्हणून त्यांना राष्ट्रपतिपदाची औपचारिक ऑफर देण्याचा निर्णय घेतला; मात्र या ऑफरमागे विरोधाभाषी गोष्टी होत्या. ना आईनस्टाईन यांना हे पद हवे होते, ना इस्रायली सरकारला त्यांचा स्वीकार व्हावा असे वाटत होते. बेन-गुरियन यांचे राजकीय सचिव यित्झाक नवोन यांच्या आठवणीनुसार, जर त्यांनी होकार दिला तर आपल्यावर मोठी अडचण येईल, पण त्यांना विचारल्याशिवायही चालणार नाही.

त्या वेळी 73 वर्षीय आइनस्टाईन अमेरिकेतील प्रिन्स्टन येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी’मध्ये संशोधनात मग्न होते. त्यांनी कधीही इस्रायलमध्ये वास्तव्य केले नव्हते आणि ते स्पष्टवक्ते, शांततावादी आणि पारंपरिक राजकारणापासून दूर राहणारे होते. अरबांसंबंधी इस्रायलच्या धोरणांवरही त्यांनी उघड टीका केली होती. 14 नोव्हेंबर 1952 रोजी वृत्तपत्रातून सुरू झालेली अफवा काही दिवसांत प्रत्यक्ष प्रस्तावापर्यंत पोहोचली. राजदूत अब्बा इबान यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला त्यांनी नकार दिला. अखेर 17 नोव्हेंबरला पत्राद्वारे अधिकृत ऑफर करण्यात आली.

आईनस्टाईन यांनी 18 नोव्हेंबरला दिलेल्या उत्तरातून नम्रपणे म्हटले होते की, मला या सन्मानामुळे आनंद झाला असला तरी राजकीय जबाबदार्‍यांसाठी आवश्यक कौशल्य माझ्याकडे नाही. माझे क्षेत्र विचार आणि विज्ञान आहे, राजकारण नाही. आईनस्टाईन यांनी विनम्रपणे नकार दिल्यानंतर यित्झाक बेन-झावी यांना राष्ट्रपतिपद देण्यात आले आणि त्यांनी 1963 पर्यंत तीन कार्यकाळ पूर्ण केले. आईनस्टाईन यांचा विनम्र नकार, इस्रायलच्या राजकीय वास्तवाशी त्यांचे न जुळणारे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे आजही तो ऐतिहासिक प्रसंग म्हणून जगाच्या स्मरणात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news